Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

जिवंत काडतुससह एक गावठी कट्टा व चोरीच्या 5 मोटारसायकल जप्त. एक आरोपी अटक

गुन्हेगारीचा पर्दाफाश….!

जिवंत काडतुससह एक गावठी कट्टा व चोरीच्या 5 मोटारसायकल जप्त. एक आरोपी अटक 
 एमआयडीसी पोलीस स्टेशनची कारवाई.

     


         लातूर जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. सोमय मुंडे यांनी जिल्ह्यात अवैध शस्त्र बाळगणाऱ्या इसमावर कारवाई करण्याबाबत आदेशित केले होते. त्याअनुषंगाने पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस ठाणे स्तरावर विशेष पथके नेमून कार्यवाही करण्यात येत होती. 
             उपविभागीय पोलीस अधिकारी लातूर शहर भागवत फुंदे यांचे मार्गदर्शनात पोलीस ठाणे एमआयडीसी पोलीस निरीक्षक गोरख दिवे यांच्या नेतृत्वात पोलीस पथकाने दिनांक 04/ 09/2023 रोजी मध्यरात्री बांभरी चौक, बायपास रोड येथून लातूर एका इसमास ताब्यात घेऊन एक गावठी कट्टा ( पिस्टल) सह एक जिवंत काडतुस, व एक मोटरसायकल हस्तगत करण्यात आली होती.
              पोलीस ठाणे एमआयडीसीच्या विशेष पथकाला गुप्त बातमीदार मार्फत मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारावर गावठी कट्टा विक्री करण्याच्या प्रयत्नात असलेला इसम नामे 

1) अरुण रणजीतसिंह जमादार, वय 22 वर्ष, राहणार शिवनखेड (खुर्द) तालुका अहमदपूर जिल्हा लातूर.
            
                 यास ताब्यात घेऊन त्याच्याकडून एक गावठी पिस्टल आणि एक जिवंत राऊंड जप्त करण्यात आले.
              याप्रकरणी पोलिस अमलदार अर्जुनसिंग राजपूत यांच्या फिर्यादीवरून पोलीस ठाणे एमआयडीसी येथे गुन्हा रजिस्टर नंबर 661/2023 कलम 3 ( 25 ) भारतीय हत्यार कायदा अन्वये गुन्हा नोंद झालेला असून एमआयडीसी पोलिस पुढील तपास करीत असताना त्याच्या ताब्यातील मोटरसायकल पोलीस ठाणे एमआयडीसी येथे दाखल असलेल्या चोरीच्या गुन्ह्यातील असल्याचे समोर आले. त्याविषयी अधिक तपास करून नमूद आरोपीने विविध ठिकाणाहून चोरलेल्या एकूण पाच मोटारसायकली जप्त करण्यात आले असून यामध्ये पोलीस ठाणे शिवाजीनगर व रेणापूर येथे प्रत्येकी एक मोटरसायकलीचा गुन्हा दाखल आहे. इतर मोटार सायकल संदर्भात तपास सुरू आहे.
              पोलीस ठाणे एमआयडीसी चे पोलीस निरीक्षक गोरख दिवे यांचे नेतृत्वात पोलीस पथकाने उत्कृष्ट कार्यवाही करत एक गावठी कट्टा जिवंत राऊंडसह व चोरीच्या पाच मोटरसायकली असा एकूण 2 लाख 96 हजार रुपयाचा मुद्देमाल नमूद आरोपीकडून जप्त केला आहे. तसेच मोटरसायकल चोरीचे तीन गुन्हे उघड केले आहेत.
          सदरची कारवाई वरिष्ठांचे मार्गदर्शनात पोलीस ठाणे एमआयडीसीचे पोलीस निरीक्षक गोरख दिवे यांच्या नेतृत्वातील पथकामधील सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिक डोके सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक भीमराव बेल्हाळे, पोलीस अंमलदार अर्जुन राजपूत, मयूर मुगळे, सचिन कांबळे, बळवंत भोसले, लोंढे, योगेश चिंचोलीकर यांनी केली आहे.

Post a Comment

You have in a dout late me know

Previous Post Next Post