Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

भाजपच्या दुचाकी रॅलीने लातूर तिरंगामय

भाजपच्या दुचाकी रॅलीने लातूर तिरंगामय
जिल्हाध्यक्ष देविदास काळे यांच्यासह पदाधिकारी व तिरंगा प्रेमी नागरीकांचा सहभाग






लातूर, दि.१३- भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या अमृतमहोत्सवानिमित्त हर घर तिरंगा हे अभियान राबविण्यात येत आहे. यानिमित्त शहर जिल्हा भाजपच्यावतीने लातूर शहरातून दुचाकी रॅली काढण्यात आली. भाजपा जिल्हाध्यक्ष देविदास काळे यांच्या पुढाकारातून काढलेल्या या रॅलीत तिरंगा ध्वजासह हजारोजण सहभागी झाले होते. रॅलीच्या सुरूवातीला भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्यास अभिवादन करण्यात आले. तर रॅलीचा समारोप छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्‍वरूढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून करण्यात आला. या रॅलीने लातूर तिरंगामय झालेले दिसून आले. तसेच रॅलीत सहभागी झालेल्यांनी भारत माता की जय, वंदे मातरम च्या घोषणांनी लातूर दणाणुन सोडले होते.
 भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त हर घर तिरंगा हे अभियान राबविण्यात येत आहे. याच्या यशस्वीतेसाठी शासकीय यंत्रणासह राजकीय व सामाजिक संघटना योगदान देत आहेत. रविवार, १३ पासून १५ ऑगस्टपर्यंत प्रत्येकाच्या घरावर तिरंगा फडकविण्यात येत आहे. यानिमित्त लातूर शहर भाजपाच्यावतीने जिल्हाध्यक्ष देविदास काळे यांच्या नेतृत्वात दुचाकी तिरंगा रॅली काढण्यात आली. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास अभिवादन करून रॅलीचा शुभारंभ करण्यात आला.रॅलीच्या अग्रभागी देवीदास काळे यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी होते. त्यांच्यासमवेत मंडल अध्यक्ष रवी सुडे, ऍड. दिग्विजय काथवटे, शिरीष कुलकर्णी, प्रवीण सावंत, अनंत गायकवाड, राम कुलकर्णी यांच्यासह हजारो दुचाकीस्वार भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते व तिरंगा प्रेमी नागरीक सहभागी झाले होते.
ही रॅली आंबेडकर पार्कवरून विवेकानंद चौक, गंजगोलाई, गांधी चौक, पीव्हीआर चौक मार्गे छत्रपती शिवाजी महाराज चौक या दरम्यान काढण्यात आली. रॅलीत सहभागी झालेल्यांनी भारत माता की जय वंदे मातरम या घोषणांनी शहर दणाणून सोडले होते. रॅलीचा समारोप छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्‍वरूढ पुतळ्यास मानवंदना देऊन पुष्पहार अर्पण करून करण्यात आला.
गुरुनाथ मगे, अनंत गायकवाड, प्रदीप मोरे, बाबू खंदाडे, आनंद कोरे, विवेक बाजपेयी, रवी सुडे, दिग्विजय काथवटे, शिरीष कुलकर्णी, शिवा सिसोदीया, गणेश गोमसाळे, देवा साळुंके, गोटू केंद्रे, संजय गिरी, विशाल हवा पाटील, अनिल पाटील, गणेश गोजमगुंडे, अजय भूमकर, दुर्गेश चव्हाण, गजेंद्र बोकन, विजू काळे, गुलाब ठाकूर, व्यंकट सरवदे, युवराज देवकते, अनिल पतंगे, आबा चौगुले, सतीश ठाकूर, गौरव मदने, प्रमोद गुडे, निखिल गायकवाड व महिला आघाडीतर्फे रागिणी यादव, मीना भोसले यांच्यासह शहरातील व्यापारी, भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते व तिरंगा प्रेमी नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते

Post a Comment

You have in a dout late me know

Previous Post Next Post