Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

आयकर विभाग करणार नोटा अदलाबदल प्रकरणाचा तपास!

गुन्हेगारीचा पर्दाफाश….!
आयकर विभाग करणार नोटा अदलाबदल प्रकरणाचा तपास! 
या प्रकरणात तपासामध्ये नावे समोर येणार्यांचे धाबे दणाणले
प्रतीकात्मक 


लातूर : ९६ लाख रुपयांच्या बदल्यात १ कोटीच्या २००० हजार रुपयांच्या नोटा घेण्यासाठी लातूरात आलेल्या एकास पोलिसांनी ५००रुपयाच्या ९६ लाख रोख रकमेसह ताब्यात घेतले आणि लातूर मध्ये एकच खळबळ उडाली. या प्रकरणी ८ जणांविरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिस तपासात आरोपींकडून ज्या लोकांची नावे समोर आली त्यांची आता धाबे दणाणले असून या घटनेची माहिती पोलीस प्रशासनाच्या वतीने आयकर विभागास देण्यात आली आहे पुढिल तपास आयकर विभाग करित असल्याची माहिती अपर पोलीस अधीक्षक डॉ. अजय देवरे यांनी दिली.

चार दिवसांपूर्वी कळंब येथील अजिंक्य अभय देवडा (वय ३२) हे ५०० रुपयांच्या नोटा असलेल्या ९६ लाख रुपयांची रोकड आपल्या कारमध्ये घेऊन लातूरात आली होती. या बदल्यात २००० हजार रुपयांचे १ कोटी रुपये त्याला देण्यात येणार होते. परंतु, पोलिसांनी त्याची कार ताब्यात घेत झडती घेतली संपूर्ण ९६ लाख रुपये ताब्यात घेतले होते. यानंतर नोटा बदलुन देणाऱ्या मयुर धोका (रा. कळंब, जि. उस्मानाबाद), शाम घोगरदरे, संदीप शिवणीकर, बालाजी रसाळकर (तिघे रा. सोलापूर), मेघशाम पांचाळ (रा. चव्हाणवाडी ता. गेवराई, जि. बीड), शेख इमाम (रा. भोकरंबा ता. रेणापूर), किशोर माने (रा. चाडगाव ता. रेणापूर), बालाजी कोयले (रा. लातूर) अशा ८ आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. परंतू,हे प्रकरण दिसते तसे सोपे नसुन या प्रकरणात आरोपींकडून एका बॅंकेचे काही डायरेक्टरचे नावे समोर आल्याची माहिती संपुर्ण लातुर शहरामध्ये चर्चीली जावू लागली.त्यामुळे पोलिसांवरती राजकीय दबाव अधिक वाढत होता.कायदेशीर बाबीच्या अनुशंघाने हा तपास आयकर विभाग करणार असल्याची माहिती मिळाली आहे.पोलिस तपासात आरोपींकडून ज्या लोकांची नावे समोर आली त्यांचे मात्र आता धाबे दणाणले आहेत.

Post a Comment

You have in a dout late me know

Previous Post Next Post