Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

भारत सरकार च्या वतीने गंगापुर ग्रामपंचायत ला राष्ट्रीय पंचायत पुरस्कार

भारत सरकार च्या वतीने गंगापुर ग्रामपंचायत ला राष्ट्रीय पंचायत पुरस्कार
तत्कालिन सरपंच बाबु खंदाडे यांच्या कामाचे कौतुक 



लातुर जिल्ह्यातील गंगापुर ग्रामपंचायतीला ला केन्द्र सरकारचा नंशनल पंचायत अवार्ड हा पुरस्कार झाला आहे. बाबु हणमंतराव खंदाडे हे लोकनियुक्त सरपंच असताना झालेल्या कालावधीतील आरोग्य यासाठी राष्ट्रीय पंचायत पुरस्कार मिळाला असुन भारताच्या मा. राष्ट्रपती महोदया यांच्या हस्ते पुरस्काराचे वाटप होणार आहे.
दि. १७ एप्रील ते २१ एप्रील २०२३ दरम्यान दिल्ली येथे हा पुरस्कार दिला जाणार आहे. ग्रामपंचायच च्या वतीने प्राथमिक आरोग्य केन्द्रास आवश्यक साहित्याची मदत, कोविड काळात व नंतर घेतली गेलेली काळजी, कोविड लसीकरण मध्ये जिल्ह्यात अव्वल स्थान, बालक व वयोवृध्द यांची तपासणी, महीलाच्या बाबतीत तपासणी, सर्व प्रकाराच्या लसी, स्वच्छता साठी घेतलेले ट्रॅक्टर, ट्रॅाली, वेगवेगळ्या ठिकानी सार्वजनिक शौचालय, आरोग्य तपासणी शिबीर, रक्तदान शिबीर, अंपगाना सुविधा, वयोवृध्दाना मदत अश्या केलेल्या कामगिरीची दखल घेऊन हा पुरस्कार जाहिर झाला आहे. 
आरोग्य व सुविधा यात देशपातळीवर पुरस्कार मिळाला आहे. सन २०२१ ते २०२२ या कालावधीतील कामासाठी हा पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. यापुर्वी ही स्मार्ट व्हीलेज पुरस्कार मिळाला असुन हा पुरस्कार व गौरव गंगापुरकराना अभिमानाची बाब ठरली असुन पाहिल्यादांच राष्ट्रीय पातळींवर चा पुरस्कार मिळावला आहे. यामध्ये जिल्हा परीषद चे मा. मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल साहेब,उप मुख्य कार्यकारी अधिकारी गिरी साहेब, तत्कालिन गटविकास अधिकारी श्याम गोडभरले सर, गटविकास अधिकारी तुकाराम भालके साहेब, विस्तार अधिकारी सोमाणी सर यांनी मार्गदर्शन केले व यात तत्कालिन सरपंच बाबु हणमंतराव खंदाडे, उपसरपंच रफीक शेख, ग्रामविकास अधिकारी राजश्री परचंडराव, आरोग्य अधिकारी प्रतापराव इगे व त्यांचा सर्व स्टाफ, सर्व आशा कार्यकर्त्या, अंगनवाडी कर्मचारी, ग्रामपंचायत कर्मचारी, ग्रामपंचायत सदस्य यांचा सहभाग आहे. सदर पुरस्कार मिळाल्या बद्दल सर्व स्तरातुन अभिनंदन होत आहे

Post a Comment

You have in a dout late me know

Previous Post Next Post