Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

मेडिकल बिलाच्या मंजुरीसाठी लाच मागणार्‍या महिला पोलिस लिपीकाला अटक

गुन्हेगारीचा पर्दाफाश….!

"आम्ही लिपिक ही काही कमी नाहीत....
मेडिकल बिलाच्या मंजुरीसाठी लाच मागणार्‍या  महिला पोलिस लिपीकाला अटक
"आम्ही लिपिक ही काही कमी नाहीत....हे दाखवून देण्याच्या उद्देशानेच भ्रष्टाचार करत असल्याचे आता उघड बोलले जावू लागले आहे. उगाचचं लाचलुचपत विभागाला "मोठे अधिकारी केंव्हा पकडणार..!तुम्हाला काय लहानच लोक दिसतात काय..?असे टोमणे सतत मारताना पाहवयास मिळत होते...परंतू आता मोठ्या सोबत हे लहान लहान कारकून आता लहान राहिले नाहित...ते जिल्हाधिकार्यालयातील २२करोड च्या घोटाळयाने सिध्द झाले आहे आणि आता लातूर पोलिस अधिक्षक कार्यालयामधील महिला कारकूनाने मेडिकल च्या बिलापोटी लाच स्विकारल्याने ते अधोरेखीत झाले आहे, तिने आत्ता पर्यंत किती माया गोळा केली हे लवकरच समजेल परंतू आपणही काही कमी नाहीत हेच दाखवून दिल्याचे चित्र दिसत आहे."

लातूर - मेडिकल बिले मंजुरीसाठी पाठवण्यासाठी तक्रारदाराकडून २४ हजार रुपयांची लाचेची मागणी करणार्‍या लातूरच्या जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयातील वरिष्ठ लिपीक कल्याणी जितेंद्र सोनवणे यांना  सोमवार दि१३ फेबु्रवारी पोलिस मुख्यालयात लाचलुचत प्रतिबंधक अधिकार्‍यांनी अटक केली.  
लातूरच्या जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयातील वरिष्ठ लिपीक कल्याणी सोनवणे यांची मूळ नेमणूक नांदेडच्या जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयात असून त्या प्रतिनियुक्तीवर लातूरच्या पोलिस अधीक्षक कार्यालयात सध्याला कार्यरत आहेत. तक्रारदार यांच्या पत्नीचे मेडिकल बिलाची मागील वर्षाची फाईल मंजूर करण्यासाठी पुढे पाठवण्याचा लाच म्हणून मोबदला २,०००/- रूपये व जानेवारी महिन्यात मंजुरीसाठी दाखल केलेल्या इतर तीन मेडिकल बिलाच्या फाईल विना त्रुटी जिल्हा शल्य चिकित्सक, सामान्य रुग्णालय, लातूर येथे पाठविण्यासाठी आणि बिल मंजुरी करिता मदत करण्यासाठी २२,०००/- रूपये असे एकूण २४,०००/- रूपयाची पंचासमक्ष लाचेची मागणी केली.
        तक्रारदार सदरची रक्कम देण्यासाठी गेले असता लिपीक सोनवणे यांना तक्रारदाराचा संशय आल्याने त्यांनी जाणीवपूर्वक लाचेची रक्कम स्विकारण्यास टाळाटाळ केली. लाच स्विकारण्यास जाणीवपूर्वक टाळाटाळ केली. या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस स्टेशन लातूर येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून लिपिक कल्याणी सोनवणे यांना अटक करण्यात आली आहे. सदरची कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली लातूरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधीक्षक पंडीत रेजितवाड, पोलिस निरीक्षक भास्कर पुल्ली व त्यांच्या टिमने केली.

Post a Comment

You have in a dout late me know

Previous Post Next Post