Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

महावितरण सहायक अभियंता यास शेती पंपा साठी वीज पुरवठा चालू करण्यासाठी दहा हजाराची लाच घेताना रंगेहाथ अटक

गुन्हेगारीचा पर्दाफाश….!
महावितरण सहायक अभियंता यास शेती पंपा साठी वीज पुरवठा चालू करण्यासाठी दहा हजाराची लाच घेताना रंगेहाथ अटक



लातूर-महावितरण विभागाचे सहायक अभियंता आरोपी लोकसेवक यांनी नागझरी गावठाण डी पी वरून तक्रारदार यांचा व त्यांचे इतर दोन शेतशेजारी यांचा शेती पंप चालु ठेवण्यासाठी आणि गावठाण डी.पी.चा शेती पंपा साठी वीज पुरवठा चालू करण्यासाठी 10,000/- रु. पंचासमक्ष लाच घेतल्या प्रकरणी सोमवार दि.६फेब्रुवारी रोजी निक्की बार जवळ बार्शी रोड येथे लाचलुचपत विभागाच्या अधिकार्यांनी रंगेहाथ पकड़ले.
    मिळालेल्या माहितीवरून तक्रारदार यांना, महावितरण विभागाचे सहायक अभियंता आरोपी लोकसेवक यांनी नागझरी गावठाण डी पी वरून तक्रारदार यांचा व त्यांचे इतर दोन शेतशेजारी यांचा शेती पंप चालु ठेवण्यासाठी आणि गावठाण डी.पी.चा शेती पंपा साठी वीज पुरवठा चालू करण्यासाठी सर्वांचे मिळून एकत्रित पणे 25,000/- रु.ची व तडजोडी अंती 10,000/- रु. पंचासमक्ष लाच मागणी केली. 
      थोड्या वेळाने लाच मागणी केलेली रक्कम घेवून तक्रारदार हे लोकसेवक यांना ठरलेल्या ठिकाणी निक्की बार जवळ बार्शी रोड येथे भेटले असता लोकसेवक बिराजदार यांनी पंचासमक्ष लाचेची रक्कम 10,000/- रु. स्वतः स्विकारली. 
     आलोसे यांना लागलीच लाचेच्या रक्कमेसह जागीच रंगेहाथ पकडण्यात आले असून. गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे.

➡ *मार्गदर्शक:-*
        डॉ. राजकुमार शिंदे , पोलीस अधिक्षक, 
        ला.प्र.वि. नांदेड परिक्षेत्र, नांदेड
        श्री. धरमसिंग चव्हाण,अपर पोलीस 
       अधिक्षक, ला.प्र.वि.नांदेड परिक्षेत्र, नांदेड.
      
➡ *सापळा पथक:-*
       पंडीत रेजितवाड, पोलीस उप अधीक्षक, 
       अँटी करप्शन ब्यूरो, लातूर व
       टीम एसीबी लातूर

➡ *सापळा मदत पथक:-*
       भास्कर पुल्ली, पोलीस निरीक्षक, 
       अँटी करप्शन ब्यूरो, लातूर व      
       टीम एसीबी लातूर
     

➡ *तपास अधिकारी:-* 
      पंडीत रेजितवाड, पोलीस उप अधीक्षक, 
     अँटी करप्शन ब्यूरो, लातूर.

-----------------------------------------------------------
*लातूर जिल्ह्यातील सर्व नागरिकांना अवाहन करण्यात येते की, त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसम (एजेंट) कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी कायदेशीर फी व्यतिरिक्त अन्य लाचेची मागणी करीत असल्यास तात्काळ आमचेशी संपर्क साधावा.*
डॉ. राजकुमार शिंदे , पोलीस अधिक्षक, 
ला.प्र.वि. नांदेड परिक्षेत्र, नांदेड
मोबाईल नंबर - 09623999944
पंडीत रेजितवाड, पोलिस उप अधीक्षक, 
ला.प्र.वि. लातुर
मोबाईल नंबर - 09309348184
ला.प्र.वि.लातूर कार्यालय दुरध्वनी - 02382-242674
@ टोल फ्रि क्रं. 1064

Post a Comment

You have in a dout late me know

Previous Post Next Post