Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

महाराष्ट्र केसरी कुस्ती रोप्य पदक विजेते आकाश देशमुख यांचे आ. रमेशआप्पा कराड यांच्याकडून अभिनंदन

Ads by Eonads
महाराष्ट्र केसरी कुस्ती रोप्य पदक विजेते आकाश देशमुख यांचे आ. रमेशआप्पा कराड यांच्याकडून अभिनंदन



       लातूर ग्रामीण विधानसभा कार्यक्षेत्रातील टाका तालुका औसा येथील भूमिपुत्र आकाश देशमुख यांनी पुणे येथे झालेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत रौप्य पदक पटकाविले या यशाबद्दल भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ रमेशआप्पा कराड यांनी शाल पुष्पगुच्छ आणि पांडुरंगाची मूर्ती भेट देऊन सत्कार करून अभिनंदन केले
      आकाश देशमुख यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत कुस्तीच्या तालीमीत सतत सराव करीत थेट महाराष्ट्र केसरी स्पर्धेमध्ये सहभाग नोंदविला आणि पुणे येथे झालेल्या ७४ किलो वजन गटातून रौप्य पदक मिळविले. आकाश देशमुख यांच्या या अभिमानास्पद कामगिरी बद्दल भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ रमेशआप्पा कराड यांनी त्यांचा यथोचित सत्कार करून कौतुक केले यावेळी भाजपाचे दीपक वांगस्कर आणि पत्रकार रामेश्वर बद्दर यांच्यासह अनेक जण होते
Ads by Eonads


Post a Comment

You have in a dout late me know

Previous Post Next Post