Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

लातूर जिल्ह्यात सुमारे 86.88 टक्के मतदान

लातूर जिल्ह्यात सुमारे 86.88 टक्के मतदान


लातूर, दि. 30 (जिमाका) : भारत निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार 05-औरंगाबाद विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी आज (दि. 30) मतदान झाले. यामध्ये लातूर जिल्ह्यातील सुमारे 86.88 मतदारांनी आपला हक्क बजाविला आहे.

सकाळी आठला जिल्ह्यातील 40 मतदान केंद्रांवर शांततेत मतदानाला सुरुवात झाली. पहिल्या दोन तासात जवळपास 10.21 टक्के मतदारांनी मतदान केले. तर दुपारी बारापर्यंत सुमारे 24.67 टक्के मतदान झाले. दुपारी दोनवाजता सुमारे 54.17 टक्के मतदानाच नोंद झाली होती. मतदानाचा कालावधी संपेपर्यंत म्हणजेच सायंकाळी चारपर्यंत जिल्ह्यात सुमारे 86.88 टक्के मतदान झाले.

मतदार यादीनुसार जिल्ह्यात 8 हजार 555 पुरुष आणि 2 हजार 741 असे एकूण 11 हजार 296 शिक्षक मतदार आहेत. त्यापैकी सुमारे 7 हजार 596 पुरुष आणि सुमारे 2 हजार 218 महिला म्हणजेच एकूण सुमारे 9 हजार 814 मतदारांनी मतदानाचा हक्क बजाविला.

Post a Comment

You have in a dout late me know

Previous Post Next Post