Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

दर्पण दिनानिमित्त माझं लातूर परिवाराच्या वतीने मोफत रक्त तपासणी शिबिराचे आयोजन

दर्पण दिनानिमित्त माझं लातूर परिवाराच्या वतीने मोफत रक्त तपासणी शिबिराचे आयोजन


लातूर : प्रत्येक वर्षी ६ जानेवारी हा दिवस राज्यभर दर्पण दिन म्हणून उत्साहात साजरा केला जातो. या दिनाचे औचित्य साधून येत्या ८ जानेवारी २०२३ रोजी माझं लातूर परिवाराच्या वतीने मोफत रक्तदाब आणि मोफत रक्त (शुगर) साखर तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.
शहरातील माऊली रक्ततपासणी केंद्र, भारतीय पुस्तकालया जवळ रविवारी दि. ८ रोजी सकाळी ८ ते ४ या वेळेत माझं लातूर परिवारातील सर्व पत्रकार, सदस्य आणि त्यांचे कुटुंबीय यांची मोफत रक्त तपासणी करण्यात येणार आहे.
जेवणापूर्वी आणि जेवणा नंतरची रक्तातील साखरेची तपासणी तसेच रक्तदाब तपासणी पूर्णपणे मोफत करण्यात येणार आहे.
या शिबिराच्या यशस्वीतेसाठी लाॅयन्सचे प्रसाद हंचाटे, रविंद्र असोपा, राजेश खंडेलवाल, डॉ.शामसुंदर सोनी, भरत हंचाटे, अक्षय डावरे यांच्यासह माझं लातूर परिवारातील सदस्य परिश्रम घेत आहेत.
शिबिरात सहभागी होण्यासाठी नाव नोंदणी आवश्यक असून नाव नोंदणी साठी अभय मिरजकर-९९२३००१८२४, प्रा.डाॅ.सितम सोनवणे-९२७०८३१७५०, संजय स्वामी-९४२२६१२२४५, काशीनाथअप्पा बळवंते-९८२२२२३४२२, दिपरत्न निलंगेकर-७७२२०७५९९९ यांच्याशी संपर्क साधावा. 
रक्तातील इतर चाचण्या स्वतंत्र करावयाच्या असतील तर केवळ नाममात्र सेवाशुल्क देऊन करता येतील. या शिबिरात माझं लातूर परिवारातील सर्व सन्माननीय मान्यवरांनी आपल्या कुटुंबातील सदस्यांसह सहभागी होऊन या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन परिवाराच्या वतीने करण्यात येत आहे.

Post a Comment

You have in a dout late me know

Previous Post Next Post