Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

पोलिसांचे मनोबल वाढवण्यासाठी त्यांना प्रशस्तीपत्र देवून सन्मान

पोलिसांचे मनोबल वाढवण्यासाठी त्यांना प्रशस्तीपत्र देवून सन्मान
पोलिस अधिक्षक सोमय मुंडे यांचे कौतुकास्पद पाऊल






पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांनी लातूर मध्ये आल्यानंतर त्यांनी पोलिस दलासाठी अतिशय कौतुकास्तब पाऊल उचलले असुन यामध्ये पोलिसदलाचे मनोबल व कार्यक्षमता वाढवण्यासाठी त्यांनी महिनाभरात केलेल्या उत्कृष्ट कार्याचे मूल्यांकन करून त्यांचा प्रशस्तीपत्र व बक्षीसपत्र देऊन सन्मान करण्यात आले.विशेष म्हणजे त्यांचा सन्मान करुन ते थांबले नाहित तर
त्यांचे फोटो व नावाचे फलक महिनाभर पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या दर्शनी भागावर लागणार आहेत त्यामुळे त्यांचे विशेष कौतुक पोलिस दलातून होत आहे


कौतुकास्पद,सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पोलीस अधिकारी/अंमलदार यांचा दर महिन्याला प्रशस्तीपत्र व बक्षीस देऊन सन्मान पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांची संकल्पना

            याबाबत थोडक्यात माहिती अशी की लातूर जिल्ह्यातील विविध पोलीस ठाणे व शाखेत नेमणुकीस असलेले पोलीस अधिकारी व अंमलदार आपले दैनंदिन कर्तव्य बजावत असताना, कायद्याची अंमलबजावणी करीत असताना पोलिसांकडून चांगल्यात- चांगली कामगिरी व्हावी.जेणेकरून त्याचा फायदा समाजाला होईल. या संकल्पनेतून संबंधित पोलिसांना सोपविलेली कर्तव्य पार पाडताना त्यांनी केलेल्या उत्कृष्ट व कौतुकास्पद कामगिरीचे मूल्यांकन करून सर्वोत्कृष्ट कार्य करणाऱ्या पोलीस अधिकारी/अंमलदार यांना दर महिन्याला प्रशस्तीपत्र व बक्षीस देऊन गौरविण्यात येणार आहे. त्याची सुरुवात दिनांक 12 नोव्हेंबर रोजी पोलीस अधीक्षक कार्यालयात झालेल्या गुन्हे परिषद बैठकीत लातूर जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्याला कार्यरत असलेले ऑक्टोंबर 2022 महिन्यामध्ये विविध शीर्षकाखाली सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पोलिसांचा पोलीस अधीक्षक श्री.सोमय मुंडे यांनी प्रशस्तीपत्र व बक्षीसपत्र देऊन सन्मान करण्यात आला.
         यामध्ये 1)गुड डिटेक्शन- स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक गजानन भातलवंडे,पोलीस उपनिरीक्षक शैलेश जाधव, पोलीस अंमलदार राम गवारे, अंगद कोतवाड तसेच पोलीस ठाणे विवेकानंदचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक बाबासाहेब खंदारे, सहायक फौजदार रामचंद्र ढगे.
2)सीसीटीएनएस डाटा फीडिंग यामध्ये पोलीस ठाणे गांधी चौक चे पोलीस निरीक्षक प्रेमप्रकाश माकोडे व महिला पोलीस अमलदार सुजाता कसपटे
3) अवैधंद्यावर केलेल्या कारवाया या शीर्षकाखाली पोलीस ठाणे अहमदपूरचे पोलीस निरीक्षक चितांबर कामठेवाड 
4) उत्कृष्ट प्रतिबंधात्मक कारवाई मध्ये पोलीस ठाणे चाकूरचे पोलीस निरीक्षक बालाजी मोहिते
5) गुन्हे निर्गती या शीर्षकाखालील पोलीस ठाणे देवणी चे पोलीस निरीक्षक गणेश सोंडारे
6) वॉरंट बजावणी मध्ये विवेकानंद पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर व पोलीस अमलदार बी.एम. गुंटे 
7)नव्यानेच सुरू झालेल्या डायल 112 रिस्पॉन्स टाइमिंग मध्ये उदगीर ग्रामीणचे पोलीस निरीक्षक दीपक कुमार वाघमारे यांच्या नेतृत्वातील पोलिस अमलदार मिलिंद बनाटे व तुकाराम कज्येवाड
8) समन्स बजावणी या शीर्षकाखाली पोलीस ठाणे किनगाव चे सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलेश बंकवाड तसेच पोलीस अंमलदार सुनील फड व सुनील श्रीरामे
9) कौतुकास्पद कामगिरी मध्ये उदगीर ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दीपककुमार वाघमारे व पोलीस अमलदार तुळशीराम बरुरे तसेच पोलीस मुख्यालय येथे नेमणुकीस असलेले व जुडो क्लस्टर खेळामध्ये महाराष्ट्र पोलिसांना सुवर्णपदक मिळवून दिलेले पोलीस अमलदार सलमान नबीजी यांचा पोलीस अधीक्षक श्री.सोमय मुंडे यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र व बक्षीस पत्र देऊन सन्मान व गौरव करण्यात आला.
             यावेळी अपर पोलीस अधीक्षक डॉक्टर अजय देवरे उपविभागीय पोलीस अधिकारी जितेंद्र जगदाळे, सुनिल गोसावी, डॅनियल बेन, मधुकर पवार तसेच सर्व ठाण्याचे पोलीस अधिकारी व अंमलदार मोठ्या संख्येने उपस्थित होते .
                पोलीस अधीक्षकांच्या या नवीन नाविन्यपूर्ण उपक्रमामुळे पोलिस अधिकारी व अंमलदार हे आपले दैनंदिन कर्तव्यपार पाडत असताना अतिशय प्रभावीपणे व तत्परतेने पार पाडतील. त्यांच्या कार्याचे मूल्यांकन होऊन त्यांना प्रशस्तीपत्र व बक्षीसपत्र मिळाल्याने त्यांचेसुद्धा मनोबल व कर्तव्यतत्परता वाढून त्याचा फायदा समाजातील विविध घटकांना पोहोचणार आहे.

Post a Comment

You have in a dout late me know

Previous Post Next Post