Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

राज्य उत्पादन शुल्क विभागाने पकडली लाखोंची दारु

गुन्हेगारीचा पर्दाफाश….!
राज्य उत्पादन शुल्क विभागाने पकडली लाखोंची दारु





लातूर :-राज्य उत्पादन शुल्क औरंगाबाद विभागाचे विभागीय उप-आयुक्त प्रदीप पवार यांनी दिलेल्या निर्देशानुसार लातूर जिल्ह्याचे राज्य उत्पादन शुल्कचे  अधीक्षक केशव राऊत, यांच्या मार्गदर्शनाखाली दि. १० नोव्हेंबर सायंकाळी च्या सुमारास बाभळगाव रोड ने  गाडी वलांडीला जात असल्याची माहिती  महाराष्ट्र युवा शक्ती संघटनेचे जिल्हाध्यक्ष अमर शिंदे व जिल्हा कार्याध्यक्ष परमेश्वर परवते यांनी दिलेल्या माहिती वरून रात्री आठ च्या दरम्यान अवैध मद्याची गाडी पकडून ४७२ लिटर विदेशी दारू आणि ९४ लिटर बीअर असा साठा हाती लागला. या कारवाईत दोन वाहने जप्त केली असून, जवळपास १० लाख ३४ हजार २३५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. .त्यामध्ये एका आरोपीला अटक करण्यात आली.तसेच विविध धाब्यावरही कार्यवाही करण्यात आली.

  मिळालेल्या माहिती नुसार राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाला दि. १० नोव्हेंबर रात्री आठ च्या दरम्यान एका सामाजिक कार्यकर्त्याने दिलेल्या माहिती वरून अवैध दारु विक्री करण्याच्या उद्देशाने MH03AH5508या क्रमांकाच्या गाडी मध्ये किंगफिशर,आर सी कंपनीची दारुचे तब्बल २५ ते ३० बाॅक्स घेवून जात असताना पथकाने रंगेहाथ पकडून मुद्देमालासह आरोपीला अटक करण्यात आली.सदर गुन्ह़यामध्ये एक चारचाकी वाहनासह ४७२ लिटर विदेशी दारू आणि ९४ लिटर बीअर असा लाखोंचा अवैध मुद्येमाल जप्त करण्यात आला.
तसेच या पथकाने लातूर मधील काही ठिकाणी मद्यपीं तसेच धाबा मालक यांच्यावर कारवाई करण्यात आली.
याबाबतची रात्री उशीरा पर्यंत कार्यवाही चालू होती
या कारवाईमध्ये     निरीक्षक आर. एम. बांगर, आर. एम. चाटे, दुय्यम निरीक्षक एल. बी. माटेकर, अमोल शिंदे, स्वप्निल काळे, अ. ब. जाधव, सहायक दुय्यम निरीक्षक गणेश गोले, ए. एल. कारभारी, जवान अनिरुद्ध देशपांडे, हणमंत मुंडे, संतोष केंद्रे, सुरेश काळे, श्रीकांत साळुंके, ज्योतीराम पवार, वाहनचालक परळीकर यांच्या पथकाने केली.
अवैध मद्यविक्री तसेच मद्यपीं व अवैध हॉटेल / धाबा विरोधात कारवाई यापुढेही चालु राहणार असून, अवैध मद्याबाबत माहिती असल्यास टोल फ्री 18002339999 क्रमांक व या कार्यालयास माहिती दिल्यास माहिती देणाऱ्याचे नांव गुप्त ठेवले जाईल असे  अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क केेेशव राऊत लातूर यांनी सांगुन अवैध मद्याबाबतची माहिती कळविण्याचेआवाहन केले आहे.

Post a Comment

You have in a dout late me know

Previous Post Next Post