Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

मराठवाडा मुक्ती संग्राम दिन साजरा होत असताना, दुसरीकडे अतिक्रमण मुक्त रस्त्यासाठी पत्रकाराचे आंदोलन

मराठवाडा मुक्ती संग्राम दिन साजरा होत असताना, दुसरीकडे अतिक्रमण मुक्त रस्त्यासाठी पत्रकाराचे आंदोलन..


  उदगीर(संगम पटवारी) एकीकडे आज रोजी मराठवाडा मुक्ती संग्राम दिन साजरा होत असताना, दुसरीकडे 64 दिवसापासून उदगीर येथे मुख्य रस्त्यावर चे अतिक्रमण काढण्याच्या मागणीसाठी पत्रकारांचे धरणे आंदोलन चालूच आहे.ही लोकशाहीसाठी लाजिरवाणी गोष्ट आहे.       उदगीर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालया पर्यंत चा मुख्य रस्ता अतिक्रमण काढल्याशिवाय रस्ताचे काम करण्यात येऊ नये, या मागणीसाठी उदगीर येथील धरणे आंदोलन करते पत्रकार हे गेली 64 दिवसापासून छत्रपती शिवाजी महाराज चौकात  धरणे आंदोलन चालू  आहे.खरे पाहता हे धरणे आंदोलन चार दिवसात मिटले असते, परंतु प्रशासनाच्या अधिकाऱ्याच्या अकार्यक्षमतेमुळे, हे आंदोलन चालूच राहीले आहे. याला जबाबदार प्रशासनाचे अधिकारी राजकीय मंडळी हेच जबाबदार आहेत. आज लातूर जिल्ह्यात पाहिल्यास वरिष्ठ अधिकारपासून ते खालच्या अधिकाऱ्यापर्यंत सर्व संबंधित अधिकारी अकार्यक्षम असल्याचे चित्र दिसून येत आहे. पत्रकार हे चौथा खांब म्हणून ओळखला जातो. त्यांच्यावर गेली 64 दिवसापासून आंदोलन करण्याची पाळी आलेली आहे ही लोकशाहीच्या दृष्टीने नाही. आज ना उद्या उदगीर तालुका हा  जिल्हा होण्याच्या मार्गावर चे शहर आहे. त्यादृष्टीने अरुंद रस्ते रुंदी  होणे गरजेचे आहे. पण याला खतपाणी घालणारे प्रशासनाचे अधिकारी के जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे.आज रोजी मराठवाडा मुक्ती संग्राम दिन साजरा होत असताना, दुसरीकडे  छत्रपती शिवाजी महाराज चौकात धरणे आंदोलन करण्याची पत्रकारावर पाळी आलेली आहे. त्यामुळे या देशात लोकशाही आहे किंवा नाही . सांगणेअवघड झालेली आहे. खरे पाहता लातूर जिल्ह्यातील जिल्हाधिकारी यांनी लक्ष घालून, पत्रकारांचे चालू असलेले धरणे आंदोलन अतिक्रमण काढून मिटवणे गरजेचे आहे. 

(स्वतंञ्य दिनाच्या अमृत महोत्सवी वर्षा दिवशीही आंदोलन करण्याची पञकारांन वर वेळ आली हे दुर्दैव आहे )

Post a Comment

You have in a dout late me know

Previous Post Next Post