Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घरावर आंदोलन ,आरे मेट्रो कारशेडला विरोध करत आंदोलन करणार्या काँग्रेस कार्यकर्त्यांना घेतले ताब्यात

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घरावर आंदोलन
आरे मेट्रो कारशेडला विरोध करत आंदोलन करणार्या काँग्रेस कार्यकर्त्यांना घेतले ताब्यात


 सत्तेतून महाविकास आघाडी सरकार पायउतार झाल्यानंतर शिंदे-फडणवीस सरकारने आरेतील मेट्रो कारशेडचे काम सुरू करण्यावरील बंदी हटवली. महाविकास आघाडीच्या सरकारने आरेतील मेट्रो कारशेडला स्थगिती दिली होती. आरेऐवजी कांजूर येथे कारशेड उभारण्यासाठी हालचाली सुरू करण्यात आल्या होत्या. मुंबई मेट्रो कारशेडचं आरे जंगलात सुरु असलेलं काम थांबवावे यासाठी आता राजकीय पक्ष मैदानात उतरत आक्रमक भूमिका घेत असल्याचं चित्र आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या पर्यावरण विभागाकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील लुईसवाडीतील घरासमोर आंदोलन करण्यातआले आहे. यावेळी पर्यावरणप्रेमींसोबतच काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी आंदोलनासाठी दाखल होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर पोलीसांनी आंदोलन करणार्यांना ताब्यात घेण्यात आले  

Post a Comment

You have in a dout late me know

Previous Post Next Post