Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

६५ ऐवजी ६० वर्षावरील जेष्ठ नागरिकांना एस टी प्रवासासह अन्य आर्थिक योजना मिळावे

 


६५ ऐवजी ६० वर्षावरील जेष्ठ नागरिकांना एस टी प्रवासासह अन्य आर्थिक योजना मिळावे 


लातूर/प्रतिनिधि

केंद्र शासनाने ६० वर्षा वरील जेष्ठ नागरिकांच्या चरितार्थ व कल्याणासाठी २००७ अधिनियम पारित केला आहे . महाराष्ट्र शासनाने ही १ मार्च २००९ पासून राज्यात लागू केला आहे . परंतु तेव्हा पासून आज पर्यंत राज्य शासन ६५ वर्ष वयाच्या मर्यादित अडकून पडले आहे . ६० वर्ष वयाचे शासनाचे जेष्ठ नागरिक धोरण असताना आज पर्यंत त्याची आमल बजावणी झालेली नाही . त्यामुळे आज ६० वर्ष असलेल्या जेष्ठ नागरिकांना एस टी पास सहीत अन्य आर्थिक योजनेचा लाभ मिळत नाही . एस टी महामंडळ या वर्षांपासून जेष्ठ नागरिकांना नवीन कार्ड उपलबध करून देत आहेत . परंतु त्यात ही ६० वर्ष वय असलेल्या जेष्ठ नागरिकांना पास  दिला जात नाही . ही  शासनाची शोकांतिका आहे . ग्रामीण भागातील जेष्ठ नागरिकांचा अशिक्षितपणा , विभक्त कुटुंब पद्धती , आर्थिक दुर्बलता व देशातील महागाई या मुळे त्यांची जीवनात आर्थिक व शारीरिक दोन्ही बाजूनी कुचंबणा होत आहे . आज राज्यात नवीव सरकार स्थापन झाले आहे . तेव्हा या सरकार कडून जेष्ठ नागरिकांना मोठी आपेक्षा  आहे . त्यांच्या या  समस्या ची सोडवणूक होईल असे त्यांना वाटत आहे . तेव्हा  ६५ ऐवजी ६० वर्ष वय असलेल्या जेष्ठ नागरिकांना एस टी प्रवासासह अन्य आर्थिक यॊजनाचा लाभ मिळावा . अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते सुनील मंदाडे यांनी जिल्हाधिकारी मार्फत राज्याचे मुख्यमंत्री यांना निवेदन केले आहे . 

मोबाईल नं . ९४२३२६२९२८

Post a Comment

You have in a dout late me know

Previous Post Next Post