Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

बाळूमामाच्या नावाने भोंदुगिरी करणार्‍या भोकरंबाच्या महाराजांची भोंदुगिरी महा.अंनिस कार्यकर्त्यांनी केली उघड!

 


बाळूमामाच्या नावाने भोंदुगिरी करणार्‍या भोकरंबाच्या महाराजांची भोंदुगिरी महा.अंनिस कार्यकर्त्यांनी केली उघड!


लातूर,दि.१९ःरेणापूर तालुक्यातील भोकरंबा महात्मा गांधी तंटामुक्त ग्राम समितीचे अध्यक्ष असलेल्या  बलभीम गणपती गोरे या महाराजाची बाळूमामाच्या नावाने चाललेली भोंदुगिरी  महाराष्ट्र अंनिसच्या कार्यकत्यार्ंंनी रविवार,दि.१ मार्च २०२०  उघड केली आहे.त्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
बलभीम गोरे हा बाळमामाच्या नावाने,येणार्‍या भक्तांना लिंबू व भंडारा देवून सर्व सामान्यांचे शोषण करीत असल्याचे महाराष्ट्र अंनिस लातूर शाखेच्या कार्यकर्त्यांना कळले. त्यानुसार लातूर अंनिसचे कार्यकर्ते रुक्साना मुल्ला, सुधीर भोसले,बाबा हालकुडे, रणजित आचार्य, हनुमंत मुंढे, यांनी नकली गिर्‍हाईक होवून भोकरंबा येथील गोरे महाराजाच्या दरबारात जाऊन खातरजमा केली. गोरे महाराज  भक्ताचे प्रश्‍न सोडविण्यासाठी कौल लावणे व भक्तांना प्रसाद म्हणून लिंबू व भंडारा मंतरून देवून तुमचे सर्व प्रश्‍न सुटतील असे सांगायचा.
अंनिसच्या रुक्साना मुल्ला यांनी,मला मुल होत नाही.लग्न होवून खुप दिवस झाले. सगळीकडे दाखवले परंतु कोणाचाच गुण येत नाही,असा प्रश्‍न महाराजापुढे ठेवला.त्यावर महाराजांनी तुमच्या नवर्‍याला सोबत घेवून या मला त्यांना तपासावे लागेल पुढील वारीस येताना सोबत घेवून या मी खात्रीशीर इलाज करतो असे सांगितले. तसेच अंनिसचे कार्यकर्ते बाबा हालकुडे यांनी त्यांना र्‍हदयविकार असल्याचे सांगितले.त्यावेळी त्यांनी बाबा हालकुडे यांच्या छातीला हळद व लिंबू लावण्यासाठी दिली व तुमचा आजार बरा होईल, असे सांगितले. खरे म्हणजे गोरे महाराजाकडे कसल्याही प्रकारची वैद्यकीय पदवी नसताना अशा प्रकारच्या आजार व उपचार करणे व लोकांची फसवणूक करणेच होय.
लातूर अंनिसच्या कार्यकर्त्यांनी पुढील वारीला जावून सदरील भोंदू गोरे महाराज यंाचा पर्दाफाश करण्याचे ठरले व ठरल्याप्रमाणे  महाराष्ट्र अंनिसचे राज्य प्रधान सचिव माधव बावगे ,महिला विभागाच्या राज्य सहकार्यवाह रुक्साना मुल्ला, लातूर जिल्हा कार्याध्यक्ष अनिल दरेकर यांनी रेणापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गोरख दिवे यांच्याशी चर्चा केली व  आपण  मदत करावी अशी विनंती केली. त्यांनीही सामाजिक भान ठेवून सर्व मदत करण्याचे आश्‍वासन दिले.ठरल्याप्रमाणे रुक्साना मुल्ला  व इम्रान सय्यद हे महाराजाकडे मुल होत नाही म्हणून गेले त्यांचे सोबत जिल्हा प्रधान सचिव सुधीर भोसले व बुवावाजी विरोधी संघर्ष विभागाचे जिल्हा कार्यवाह रणजित आचार्य हे होते. तर जिल्हा कार्याध्यक्ष अनिल दरेकर व लातूर शहर शाखेचे प्रधान सचिव हनुमंत मुंढे हे पो.नि.गोरख दिवे व त्यांचे काही कर्मचारी यांसह भोकरंबा या गावी गेले.
अंनिसच्या रुक्साना मुल्ला आणि इम्रान सय्यद यांनी आपणास मुल होत नाही यावर काहीतरी उपाय करा असे सांगितल्यावर महाराजांनी त्या दोघांचे अंगावरचे वापरायचे जुने कपडे व उपचारासाठी तीन ते साडेतीन हजार रुपये लागतील ते तुम्ही घेवून यावर मी तोडगा काढतो व पुढील दोन ते तीन महिन्यात आपणाला मुल राहिल असे सांगितले. विशेष म्हणजे तो म्हणाला की मी कोणाकडूनही पैसे घेत नाही,तुम्ही पैसे बाळूमामाच्या फोटोपुढे ठेवा असे सांगून तो आलेल्या भक्तांकडून पैसे घेत असे.यावेळी अनेक भक्त होते.यावरुन येथे खुप मोठे आर्थिक गणित दिसून आले.यावेळी कार्यकर्त्यांनी महाराजांना अनेक प्रश्‍न विचारले.तेव्हा महाराजांनी उडवाउडवीची उत्तरे दिली तसेच  मला यातले काहींच कळत नाही व असे काहीही मंत्रशक्तीने किंवा कशाने काहींच होत नसते असे तो सर्वांसमक्ष म्हणाला, व तुम्ही सांगेल तसे मी करेन, यापुढे मी हा दरबार बंद करतो,कोणाचीही फसवणूक करणार नाही,असे म्हणून त्यांने शंभर रुपयंाच्या बॉंड पेपरवर पोलीस ठाण्यामध्ये येवून लिहून दिले.त्यामुळे गोरे महाराजाची भोंदुगिरी उघड झाली.
या कामी रेणापूर पोलीस ठाण्याचे पो.नि.गोरख दिवे, कर्मचारी पोह गौतम कांबळे, पोना नरसिंग जाधव, पोकॉ कृष्णा शेळके,महिला पेालीस आसमा पठाण, सरस्वती कोतमे आदींचे सहकार्य मिळाले.


Post a Comment

You have in a dout late me know

Previous Post Next Post