Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

परिगंधा झालेल्या दोन अल्पवयीन मुलिंचा १३तासाच्या आत शोध- पोलिस प्रशासनाचे कौतुक

 


परिगंधा झालेल्या दोन अल्पवयीन मुलिंचा १३तासाच्या आत शोध- पोलिस प्रशासनाचे कौतुक


सांगली/ प्रतिनिधी /एकनाथ कांबळे
कडेगांव तालुक्यातील एका गरीब कुटुंबातील दोन अल्पवयीन मुली  आपल्या घरातील किरकोळ वादावादी च्या कारणावरून दिनांक ०६/०३/२०२० रोजी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास त्यांचे राहते घरातून घरच्यांना कोणतीही माहिती न देता घर सोडून निघून गेल्या होत्या  या घटनेची तक्रार त्यांच्या नातेवाईकांकडून कराड शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली! या तक्रारीत कोणत्याही स्वरूपाचा पुरावा उपलब्ध नसताना 
कराड शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक मा.भरत पाटील साहेब यांच्याकडे पुढिल तपास करण्यासाठी देण्यात आला  काही वेळेतच मा.पाटिल यांनी तपासणी सुरू केली असता डि मार्ट शोरूम कराड येथील सि.सी.टिव्ही फुटेज पाहणी केली असता परिगंधा झालेल्या दोन अल्पवयीन मुली फुटेज मध्ये दिसून आल्या असल्याने या अल्पवयीन मुलींच्या अज्ञानपणाचा  गैर फायदा कोणीतरी घेईल असे तक्रारीत नमुद करण्यात आले होते  
याच्या आधारे कराड चे उपविभागीय पोलिस अधिकारी मा.सुरजजी गुरव साहेब व मा.बी.आर.पाटिल वरिष्ठ पोलिस निरीक्षक कराड शहर पोलिस ठाणे,मा.एम.एस.सोरटे पोलिस निरीक्षक गुन्हे अन्वेषण विभाग कराड,व पोलीस पदाधिकारी यांच्या पथकाने या मुलींबाबत आपल्या संपर्कातील सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील बातमीदारामार्फत गोपणिय रित्या माहिती काढून  सांगली जिल्ह्यातील मिरज याठिकाणी जावून सांगली जिल्ह्यातील पोलिस प्रशासन यांच्या मदतीने त्या दोन अल्पवयीन मुलिंचा तपास सुरू केला व अवघ्या तेरा तासांच्या आत   अत्यंत कौशल्याने सदर दोन अल्पवयीन मुलिंचा शोध घेवून कराड पोलिस ठाण्यात घेऊन आले व विचारणा करीत असता किरकोळ वादावादीचे कारण सांगून गेले चे मुलीच्या कडून सांगतेय आले  त्यापैकी एका मुलीचा वाढदिवस आज आहे असे मुलीकडून सांगनेत आले हे ऐकून पोलिस प्रशासन यांच्या वतीने पोलिस ठाण्यात उद्या होणा-या महिला दिनाचे औचित्य साधून व त्यांच्या कुटुंबियांच्या दु:खावर फुंकर घालत  कराड शहर पोलिस प्रशासनाने केक आणून मुलीचा वाढदिवस साजरा केला  व आनंदाने दोन्ही मुलींना त्यांच्या कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आले 
याचाच अर्थ असा की पोलिस प्रशासन हे अतिशय प्रामाणिक पणे काम करत असतात त्यांच्या या कामगीरी बद्दल पोलिस पदाधिकारी यांचे सर्वत्र कौतुक होत आहे असे दिसून येते आहे!


Post a Comment

You have in a dout late me know

Previous Post Next Post