Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

लातूर येथे होणार्या नाट्यसंमेलनास सर्वतोपरी सहकार्य करणार - ना. अमित देशमुख


अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या नाट्यसंमेलन सर्वतोपरी सहकार्य करणार - ना. अमित देशमुख


अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या शिष्टमंडळाने घेतली ना.अमित देशमुख यांची भेट


लातूर : अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या वतीने यंदा लातूर जिल्ह्यात ४ मे ते १० मे या कालावधीत १०० व्या नाट्य संमेलनाचे आयोजन होत आहे. लातूरमध्ये पहिल्यांदाच नाट्यसंमेलन होत असून याचे आयोजन नाट्यपरिषद लातूर महानगर शाखा करीत आहे. त्यासंदर्भात रविवार दिनांक ८ मार्च रोजी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या शिष्टमंडळाने राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री व वैद्यकीय शिक्षण मंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांची बाभळगाव निवासस्थानी भेट घेतली. 


यावेळी संमेलनाच्या नियोजन, कार्यक्रमासंदर्भात शिष्टमंडळाने त्यांच्याशी सविस्तरपणे चर्चा केली. राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री व वैद्यकीय शिक्षण मंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री अमित देशमुख यांनी या संमेलनाला शुभेच्छा देऊन सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन यावेळी दिले.


यावेळी महाराष्ट्र नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रसाद कांबळी, कार्यवाह सुप्रसिद्ध अभिनेते शरद पोंक्षे, लातूर महानगर शाखेचे अध्यक्ष शैलेश गोजमगुंडे, शुभदा रेड्डी, बालाजी शेळके, डॉ. दीपक वेदपाठक, सुधनवा पत्की, बाळकृष्ण धायगुडे, महेश बिडवे आदी उपस्थित होते.


Previous Post Next Post