Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

क्लब ,हॉटेल, धाबे परमिटरुम चालकांनी आपत्ती व्यवस्थापन सुचनांचे काटेकोरपणे पालन करावे -जिल्हाधिकारी जी. श्रीकांत

 


क्लब ,हॉटेल, धाबे परमिटरुम चालकांनी  आपत्ती
व्यवस्थापन सुचनांचे काटेकोरपणे पालन करावे
                                 -जिल्हाधिकारी जी. श्रीकांत


लातूर,दि.19:- लातूर जिल्हयात सर्व प्रकारचे पत्याचे क्लब, हॉटेल, धाबे ,परमिटरुम, बेकरी, स्वीटमार्ट, चाट भंडार इत्यादी ठिकाणी मोठया प्रमाणात नागरिकांची गर्दी होत आहे. त्यामुळे जिल्हयात करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा एक भाग म्हणून नागरीकांची एका ठिकाणी होणारी गर्दी टाळण्यासाठी लातूर जिल्हयातील सर्व प्रकारचे हॉटेल, धाबे, परमिटरूम, बेकरी, स्वीटमार्ट, चाट भंडार इत्यादी ठिकाणी पुढील प्रमाणे उपाययोजना करणे बंधनकारक करीत आहे.
क्लब,मंगलकार्यालय ३१मार्च पर्यंत बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत,चालू राहिल्यास कायदेशीर कार्यवाही करण्यात येणार आहे तसेच मालकाला १वर्षाची शिक्षा ही होवू शकते असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
हॉटेल मधील दोन टेबल मधील अंतर किमान तीन (3) मीटर असावे. हॉटेल मधील प्रत्येक टेबलावर दोन ते तीन पेक्षा अधिक व्यक्ती बसणार नाहीत याची दक्षता घ्यावी, हॉटेल बाहेरील खुल्या जागेतील व्यवसायाच्या ठिकाणी (जसे चाट भंडार इत्यादी ) पाच पेक्षा जास्त व्यक्ती एका वेळेस थांबणार नाहीत याची दक्षता घ्यावी. शक्यतो हॉटेलमध्ये येणाऱ्या ग्राहकांना पार्सल नेण्याची विनंती करावी व तशा प्रकारे सुचनाफलक हॉटेल बाहेर लावावेत. व तशी सोय उपलब्ध्‍ करुन दयावी. कोणत्याही कारणामुळे हॉटेलमध्ये गर्दी होणार नाही आणि शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचा भंग होणार नाही याची दक्षता घ्यावी.
अन्न व औषध प्रशासन विभाग / स्थानिक स्वराज्य संस्थेने दिलेल्या परवान्यातील अटी व शर्तीचे काटेकोरपणे पालन करावे. हॉटेलमध्ये ग्राहकांसाठी सॅनेटायजर, हॅन्डवॉश, साबण या सारख्या स्वच्छतेच्या दृष्टीने आवश्यक असलेले साधनं उपलब्ध्‍ करुन दयावीत. लातूर जिल्हयात सर्व प्रकारचे हॉटेल, धाबे, परमिटरुम, बेकरी, स्वीटमार्ट, चाट भंडार चालकांनी वरील बाबींचे काटेकोरपणे पालन करावे. सदर आदेशाचे  उल्लंघन केल्यास त्यांच्या विरुध्द भारतीय दंड संहिता कलम 188 नुसार कार्यवाही करण्यात येईल याची नोंद घ्यावी, असे जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी जी. श्रीकांत यांनी कळविले आहे


Post a Comment

You have in a dout late me know

Previous Post Next Post