हिंगणघाट जळीतकांड पीडितेचा अखेर मृत्यु
वर्ध्यातील हिंगणघाट जळीतकांड पीडितेची झुंज अखेर अपयशी ठरली. आज दि.10 फेब्रुवारी रोजी सकाळी 6 वाजून 55 मिनिटांनी हृदयविकाराच्या झटक्याने तिचा मृत्यू झाला. रविवारी 9 फेब्रुवारी रात्रीपासून तिचा रक्तदाब आणि हृदयाचे ठोकेही कमी झाले होते. सात दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर आज नागपूरच्या ऑरेंज सिटी रुग्णालयात तिने अखेरचा श्वास घेतला.