स्वामी विवेकानंद`चे स्नेह संमेलन उत्साहात साजरा!
उदगीर /प्रतिनिधी/डि.के.उजळंबकर
उदगीर- येथील स्वामी विवेकानंद शिक्षण प्रसारक मंडळ संचलित स्वामी विवेकानंद महाविद्यालय, स्वामी विवेकानंद काॅलेज आॅफ फार्मसी,स्वामी विवेकानंद अध्यापक विद्यालय व महाविद्यालयाचा संयुक्त वार्षिक स्नेह संमेलन `अंतरंग २०२०` मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे उदघाटक म्हणून शिवाजी महाविद्यालयाचे इंग्रजी विभागप्रमुख प्रा.डॉ.अरविंद नवले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष डॉ.सुधीर जगताप होते तर प्रमुख पाहुणे म्हणून लातूर जिल्हा युवक काँग्रेस अध्यक्ष तथा नगरसेवक विजय निटुरे,तहसिलदार व्यंकटेश मुंढे,महात्मा फुले ग्रामिण विकास संस्था जळकोटचे सचिव चंदन पाटील नागरगोजे,संस्थेचे कोषाध्यक्ष विठ्ठलराव पाटील,प्रशांंत जगताप,शैक्षणिक संचालक संजय हट्टे,जयहिंद स्कुलच्या शैक्षणिक संचालक डॉ.अन्नपूर्णा चिंतालुरी,फार्मसी काॅलेजचे प्राचार्य गणेश तोलसरवाड,महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.भिमाशंकर कोडगे,प्रा.परशुराम पाटील,कृष्णा गठ्ठडे,विद्यार्थी प्रतिनिधी श्रध्दा येरावार,त्वरीता मिटकरी यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी डॉ.नवले म्हणाले, महाविद्यालयीन काळ हा विद्यार्थ्याच्या जिवनातील अत्यंत महत्वाचा काळ असतो. कारण याच काळात त्याच्या जिवनाला खर्या अर्थाने कलाटणी मिळत असते. स्वप्न सत्यात उतरविण्याचा हाच कालखंड असून विद्यार्थी जिवनाचा आनंद घेत असताना आपल्यावरील जबाबदारी व आई वडिलांच्या तुमच्याकडून असणार्या अपेक्षांचे भानपण ठेवणे आवश्यक असल्याचे सांगून सांस्कृतिक सहभागासोबतच अभ्यासाकडेही तेवढेच लक्ष असावे असा सल्ला दिला.
निटुरे यांनी, मी ही अशा स्नेह संमेलनाच्या माध्यमातून घडलो आहे. स्नेह संमेलनात सादर होणार्या कलांचा आस्वाद घ्या व त्यांना भरभरुन दाद द्या असे सांगितले.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते वार्षिक स्नेह संमेलनानिमित्त घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांच्या विजेत्यांना पारितोषिके देऊन गौरविण्यात आले.
अध्यक्षीय समारोप डॉ.सुधीर जगताप यांनी केले.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपज्वलन व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन करुन करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संजय हट्टे,सूत्रसंचलन नर्सिंग महाविद्यालयाचे प्रशासकीय अधिकारी राजेंद्र संगेकर यांनी तर आभार डॉ.कोडगे यांनी मानले.
कार्यक्रमास नर्सिंग महाविद्यालयाच्या प्राचार्या दीपा अन्बू, उपप्राचार्या ज्योती स्वामी, फ्लोरेन्स नर्सिंग महाविद्यालयाचे प्राचार्य नागसेन तारे, कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या मनोरमा शास्त्री,जयहिंद स्कुलचे उपप्राचार्य सतिष वाघमारे,प्रा.बालाजी गायकवाड,प्रा.राशेद दायमी,प्रा.आसिफ दायमी,प्रा.पूजा बिरादार,प्रा.हनमंत सूर्यवंशी,प्रा.कैलास कांबळे,प्रा.बालाजी सकनुरे,प्रा.श्रीपाद अहंकारी,प्रा.पल्लवी कानडे,प्रा.रोहिणी होळकुंदे,ग्रंथपाल उषा गायकवाड, संतोष माने,प्रदीप पाटील,अमोल भाटकुळे,संदेश गवळे,मुरलीधर देशमुख यांच्यासह सर्व विभागप्रमुख,प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी,पालक, विद्यार्थी विद्यार्थिंनींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.