श्री विठ्ठल शास्त्री महाराजांच्या अप्रकाशित काव्यांचे प्रकाशन
लातूर दि.१(प्रतिनिधी)- चाकूर येथील संत, पारमार्थिक कवी व नारदीय कीर्तनकार श्री विठ्ठल शास्त्री महाराज उपाख्य श्री विष्णवानंद सरस्वती स्वामी महाराज यांच्या अप्रकाशित असणाऱ्या काव्याचे प्रकाशन १३ नोव्हेंबर रोजी करण्यात येत आहे.
चाकूर येथील माझी माय मंगल कार्यालयात दिनांक - 13 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी 10 वाजता आयोजित करण्यात आलेल्या प्रकाशन सोहळ्यात
श्रीमद जगद्गुरु शंकराचार्य
करवीर पिठाधीश ,प. पु. श्री. विद्यानृसिंह भारती स्वामी महाराज यांच्या हस्ते आणि
, ह भ प श्री. गुरुराज महाराज देगलूरकर , ह भ प श्री माधवबुवा महाराज आजेगावकर , ह भ प श्री विकास बुवा डिग्रसकर , मनोहररावजी ढोक सदस्य, विदर्भ साहित्य परिषद
नागपूर यांच्या उपस्थितीत श्री विठ्ठल शास्त्री महाराजांच्या अप्रकाशित काव्यावरील पुस्तकाचा प्रकाशन सोहळा संपन्न होणार आहे. या कार्यक्रमास उपस्थित रहावे असे आवाहन ह.भ.प. रामदास शास्ञी, शास्त्री परिवारातील सदस्य
आणि चाकूर ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.
Tags:
LATUR
