'लाॅर्ड व्यंकटेशा'गणेश मंडळाच्या मुर्ती ची आरतीMVM Developer's चे मयुर मंत्री यांच्या हस्ते
लातूर-लातूर-एल आय सी काॅलोनी येथे दरवर्षा प्रमाणे याही वर्षी'लाॅर्ड व्यंकटेशा'गणेश मंडळाची स्पापना करण्यात आली आहे.या गणेश मंडळात खेळ,रांगोळी स्पर्धा,गायन स्पर्धा अशा विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात येतात.यावेळी लाॅर्ड व्यंकटेशा'गणेश मंडळामध्ये अतिशय भव्य दिव्य अशी मुर्ती स्थापन करण्यात आली.त्यानिमित्त दहा दिवस विविध मान्यवरांच्या हस्ते गणेश मुर्तीचे पुजन करण्यात येते.मंगळवार दि २ सप्टेंबर रोजी सायंकाळी लाॅर्ड व्यंकटेशा'गणेश मंडळाच्या मुर्तीची पुजा सामाजिक कार्यात सदैव अग्रसेर असलेले,स्वभावाने अतिशय नम्र आणि मन मिळावू तसेच नांदेड़ आणि लातूर या ठिकाणी सर्वसामान्यांना परवडणारी घरे बांधून एक प्रकारे सामाजिक बांधिलकी जपणारे MVM Developer's चे मयुर मंत्री यांच्या हस्ते करण्यात आली.
आरतीच्या यावेळी शेकडोंच्या संखेत गणेश भक्त उपस्थित होते.आरती झाल्यानंतर सर्व भक्तांना प्रसादाचे वाटप करण्यात आले..यावर्षी च्या गणेशोत्सवात लातूर मधील जास्तीत जास्त भाविक नागरिकांनी गणेशाच्या दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन कॉलनीतील सर्व नागरिकांना केले आहे.
यावेळी लाॅर्ड व्यंकटेशा'गणेश मंडळाचे संस्थापक अध्यक्ष श्री संजय राठोड़ लाॅर्ड व्यंकटेशा'गणेश मंडळाचे अध्यक्ष सचिन राजू राठोड ,आकाश आडे , उपाध्यक्ष, कोषाध्यक्ष रवि साळूंके,
सचिव विक्रम पवार , सचिव नारायणकर सर , सचिव बंटी राठोड, श्री कंठे , सतिष साळुंखे , सचिन राठोड , दीपक कदम , रमाकांत जाधव , राम विश्वनाथ स्वामी , घोडके सर, संजय राठोड , साईराज राठोड, विष्णू राठोड, जगदीश राठोड, सचिन राठोड़, प्रसिद्धीप्रमुख विष्णू आष्टीकर, राम पाटोळे ,संतोष अस्वार उपस्थित होते
Tags:
LATUR