किरकोळ कारणावरुन अपहरण, जबरी चोरी करुन खुन करणाऱ्या आरोपीस अटक.
दिनांक 29/09/2025 रोजी मयत अमिरअली सय्यद व उत्तरप्रदेशातील कामगार लोकेशकुमार, सचिनकुमार, इशेंद्रकुमार असे सोलापुर येथुन मयताचे गावी सायगाव ता. अंबाजोगाई जि.बिड कडे जाणेसाठी लातुर येथे आले असता Inch रेणापुर नाका लातुर येथे रात्री 1.30 वाजणेच्या सुमारास ऑटोचा धक्का लागल्यानंतर झालेल्या वादाचे कारणावरुन ऑटो मध्ये आलेल्या समिर नावाचे इसमाने व त्याचे सोबतच्या अनोळखी ऑटो चालक इसमाने अमिरअली सय्यद यास हाताने व चाकुने मारहाण करुन चाकुचा धाक दाखवुन अमिर जवळील मोबाईल हिसकावुन घेवुन त्यास त्यांचेजवळील ऑटो मध्ये जबरदस्तीने बसवुन घेवुन जावुन चाकुने मारहाण करुन अमिरअली सय्यद यास जिवे ठार मारुन हॉटेल आण्णा व्हेज नॉनव्हेज चे गेट समोरील रिंग रोडचे कडेला टाकुन निघुन गेले. वगैरे तक्रार मयतासोबत असलेला कामगाराचे फिर्यादवरुन पो.स्टे. विवेकानंद चौक लातुर येथे गुरन 647/2025 कलम 103(1),140(4), 311,3(5) बीएनएस प्रमाणे गुन्हा दाखल करुन पुढील तपास सपोनि खोडेवाड हे करित आहेत.
माहीती मिळताच घटनास्थळी वरिष्ठ पोलीस अधिकारी तसेच उपविभागीय पोलीस अधीकारी लातूर शहर श्री समीरसिंह साळवे, पो.नि. बावकर स्था.गु.शा. लातुर यांनी तात्काळ भेट देवुन यातील आरोपीतांचा शोध घेणे बाबत व तपासाबाबत सुचना दिल्या. दिलेल्या सुचनेप्रमाणे पो.स्टे. विवेकानंद चौक येथील पोलीस निरीक्षक संतोष पाटील यांनी त्यांचे स्टापसह तपास करुन गुन्ह्यातील आरोपी शेख समीर दिलावर,वय 26 वर्षे रा. साई रोड आर्वी लातुर यास अटक करुन त्याचेकडुन गुन्ह्यातील हत्यार तसेच गुन्हा करण्यासाठी वापरलेला ऑटो जप्त करण्यात आला आहे.
तसेच एक विधीसंघर्षग्रस्त बालक यास ताब्यात घेण्यात आले असुन गुन्ह्याचा पुढील तपास चालु आहे.
सदरची कामगीरी पोलीस अधीक्षक श्री.अमोल तांबे, अपर पोलीस अधीक्षक श्री.मंगेश चव्हाण, उपविभागीय पोलीस अधीकारी लातूर शहर श्री. समीरसिंह साळवे यांचे मार्गदर्शनात पोलीस ठाणे विवेकानंद चे पोलीस निरीक्षक संतोष पाटील यांचे नेतृत्वात पोलीस ठाणे विवेकानंद चौक, लातूर येथील सपोनि अन्नाराव खोडेवाड, वसंत मुळे, पोउपनि रेडेकर, पोलीस अमंलदार खुर्रम काझी, सुनिल हराळे, रविंद्र गोंदकर, यशपाल कांबळे, रणविर देशमुख, धैर्यशिल मुळे, सचिन राठोड, गणेश यादव,आनंद हल्लाळे, दयानंद उपासे, महेबुब शेख, चालक दिपक कांबळे यांनी केली आहे.