गाड्यांना जॅमर लावणाऱ्यां एजन्सी कडून अरेरावी करत करतायत दुप्पट वसूली
लातूर -
मनपा टोईंग , गड्यांना जॅमर लावणाऱ्यां च्या मनमानी , अरेरावी विरुद्ध लातूर व्यापारी संघर्ष समिती ने मनपा अधिकाऱ्यांची भेट घेऊन निवेदन दिले त्यात 50 रू टू व्हीलर चे दर असताना 100 रू मनपा चे टोईंग , जॅमर लावणारी ऐजन्सी चार्ज करत आहे दर पत्रक टू व्हिलर 50 रू , फोर व्हीलर 100 रू , अवजड वाहन 200 रू दर मनपाने ठरवून दिलेले आहेत , तरी हि मनपा ने टेंडर दिलेली विश्वा ऐजन्सी दुप्पट दर आकारत आहे , दर तर आकारत आहेच सोबत अरेरावी ची भाषा शिवी गाळ ऐजन्सी चे कर्मचारी सररास करतात , एक मिनीट जरी गाडी साईड ला थांबवून वर बसलेले असताना ही मनपा ऐजन्सी चे कर्मचारी जॅमर लातात , फोर व्हिलर मधून माणसे दुकानात जाण्यासाठी उतरतायत ड्रायव्हर सिट वर आहे गाडी चालू आहे , फमॅली उतरल्यावर गाडी पार्किग च्या ठिकाणी पार्किंग करणार आहे असे सांगून सुद्धा हे कर्मचारी जॅमर लावतात उधट उत्तर देतात , हे सर्व लातूरची जनता मागिल बऱ्याच वर्षा पासून सहन करत आली आहे पण आता नाही करणार , लातूर व्यापारी कृती समिती च्या वतीने मनपा ला निवेदन देण्यात आले आहे की , दर पत्रक चे बैनर लावण्यात यावे , जॅमर लावणाऱ्या कर्मचाऱ्याना ID कार्ड गणवेश द्यावा , कर्मचारी सुशिक्षित असावेत कमित कमी 12 पास असावे ,जॅमर लावण्या आधी 3 वेळेस अनांउसमेंट व्हावी , त्वरीत नविन टेंडर काढून नविन ऐजन्सी नेमावी , जुन्या ऐजन्सीला त्वरीत तात्काळ त्यांचे काम बंद करावे त्यांच्यावर कार्यवाही करावी .
लातूर व्यापारी संघर्ष समिती तर्फे
हेमंत जाधव , नरेंद्र बोरा , मनसूर खान , फेरोज शेख ,तोसिफ शेख विशाल भांडे
Tags:
LATUR