गुंडगिरी करणाऱ्या कार्यकर्त्यांवर तात्काळ गुन्हा दाखल करा!
लातूरचे स्थानिक आमदार विकासकामांच्या नावाखाली जनतेच्या डोळ्यात धूळफेक करत असून, बेकायदेशीरपणे भूमिपूजनाचे कार्यक्रम आयोजित केले जात आहेत. त्यांच्या या दिखाव्याचा पर्दाफाश करण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी लोकशाही मार्गाने आंदोलन केले. मात्र या आंदोलनावर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी अमानुष हल्ला चढवून, लातूर शहराची आणि राज्याची संस्कृती कलंकित केली आहे.
या गुंड प्रवृत्तीच्या काँग्रेस कार्यकर्त्यांविरोधात कडक कारवाई व्हावी, यासाठी आज भारतीय जनता पार्टी लातूर शहर जिल्ह्याच्या शिष्टमंडळाने गांधी चौक पोलीस स्टेशनमध्ये लेखी तक्रार दाखल केली आहे.