Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

एम.डी. ड्रग्स प्रकरणाचा उलगडा;कोणी कोणी ड्रग्स घेतले त्यांची नावे आली समोर


एम.डी. ड्रग्स प्रकरणाचा उलगडा;कोणी कोणी ड्रग्स घेतले त्यांची नावे आली समोर




                 याबाबत अधिक माहिती अशी की, दिनांक 11 जुलै रोजी पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेने एमडी ड्रग्ज अवैध रीत्या जवळ बाळगलेला असताना एलआयसी कॉलनी येथील एकाला व त्याच्यासोबत आणखीन एक मुंबई येथील इसमाला ताब्यात घेतले होते. त्यांच्याकडून 79 ग्राम इतका एमडी ड्रग्स व एक गावठी पिस्टल मिळून आले होते.त्यांच्याविरुद्ध पोलीस ठाणे विवेकानंद चौक येथे गुन्हा नोंदविण्यात आला होता. गुन्ह्याचा तपास सुरू आहे. 
                वरिष्ठांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस ठाणे विवेकानंद चौक पोलिसांच्या संयुक्त पथकाने अधिक तपास करत अटकेमध्ये असलेले आरोपी गणेश अर्जुन शेंडगे व रणजीत तुकाराम जाधव यांच्याकडून एमडी ड्रग्स चे सेवन करण्यासाठी विकत घेणारे लातूर येथील इसम नामे

1)अजय धनराज सूर्यवंशी, वय 21 वर्ष राहणार शिवपार्वती नगर, कन्हेरी शिवार, लातूर.

2)अजर सय्यद,वय 28 वर्ष राहणार रत्नापूर चौक, लातूर.

3)अर्जुन उर्फ गोटया अच्युतराव कूपकर, वय 30 वर्ष राहणार आर्वी तालुका जिल्हा लातूर

           यांना दिनांक 12 जुलै रोजी त्यांच्या राहते ठिकाणाहून ताब्यात घेऊन तपास केला तेव्हा वर तीनही इसम हे गणेश शेंडगे चे जवळचे मित्र असून त्यांनी आम्ही, गणेश शेंडगे यांच्याकडून स्वतःसाठी सेवन करण्यासाठी ड्रग्स घेत असल्याचे तसेच त्यांच्या जवळच्या मित्रांनाही सेवन करण्यासाठी गणेश शेंडगे याचे कडून ड्रग्स उपलब्ध करून देत असल्याचे सांगत आहेत.
          एकंदरीत वर तीनही आरोपी गणेश शेंडगे याचे जवळचे मित्र असून ते मोठ्या प्रमाणात व्यसनाधीन व नशेबाज असल्याचे समोर आले आहे.
               तांत्रिक व गोपनीय माहितीचे विश्लेषण करून वरिष्ठांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे व पोलीस ठाणे विवेकानंद चौक चे संयुक्त पथक अधिक तपास करीत असून सदरचे अमली पदार्थ नेमके कोठून आले, कोणी दिले याबाबतही गोपनीय माहिती हस्तगत करण्यात येत असून त्या दिशेने दोन तपास पथके पुढील तपास कामी रवाना करण्यात आलेले आहेत.
Previous Post Next Post