Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

महापालिकेच्या निवडणुकीसाठी काँग्रेसची तयारी सुरू; लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीकडून झोन प्रमुखांच्या नियुक्त्या.

महापालिकेच्या निवडणुकीसाठी काँग्रेसची तयारी सुरू; लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीकडून झोन प्रमुखांच्या नियुक्त्या.



लातूर प्रतिनिधी-दि.

लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीने आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक पार्श्वभूमीवर पक्ष संघटन वाढिसाठी शहरातील वेगवेगळ्या झोनकरिता पक्षातील झोनप्रमुखांची नियुक्ती करीत निवडणुकीची तयारी सुरू केलीय.

आगामी काळात महाराष्ट्रातील महानगरपालिका, जिल्हा परिषद,पंचायत समिती निवडणुकांचे बिगुल वाजण्याची चिन्हे असून प्रशासन प्रभाग रचना व अन्य निवडणूक पूर्व कामात व्यस्त झाले असून
लातुरात काँग्रेस पक्षाकडून देखील लातूर महापालिका निवडणुकीसह जिल्हा परिषद तसेच पंचायत समिती निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर पक्ष संघटन वाढीच्या दृष्टीने तयारी सुरू कली आहे. 

याचाच एक भाग म्हणून काँग्रेस पक्षाचे प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ,राज्याचे माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख,राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा लातूरचे आमदार अमित विलासराव देशमुख तसेच लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन माजी आमदार धिरज देशमुख यांच्या सूचनेनुसार लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष ॲड.किरण जाधव यांनी लातूर शहरातील काँग्रेस पक्षाचे झोन प्रमुखांची नियुक्ती केली आहे. 
यामध्ये लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अल्पसंख्यांक विभागाचे अध्यक्ष ॲड.फारुक शेख यांची झोन "अ" च्या प्रमुख पदी नियुक्ती केली गेली आहे या झोनमध्ये प्रभाग १,२,७,८,९ या प्रभागांचा समावेश आहे, माजी उपमहापौर कैलास कांबळे यांना झोन "ब" च्या प्रमुख पदी जबाबदारी दिली असून या झोन मध्ये प्रभाग ३,४,५,६ समाविष्ट आहेत,तर पश्चिम भागातील सामाजिक कार्यकर्ते,उद्योजक सूर्यकांत कातळे यांची झोन "क" च्या प्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली आहे या झोन मध्ये प्रभाग १०,११,१२,१३,१४ या प्रभागांचा समावेश असून
प्रभाग १५,१६,१७,१८ चा समावेश असलेल्या
झोन "ड" करिता झोन प्रमुख निवड लवकरच करण्यात येणार आहे अशीही माहिती देण्यात आली.

लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीकडून निवड करण्यात आलेल्या या झोन प्रमुखांच्या निवडीचे स्वागत होत असून लातूर काँग्रेस सर्व ताकतीनिशी आगामी महापालिकेच्या निवडणुकीला सामोरे जात 
लातूर महानगरपालिकेवर काँग्रेसचा तिरंगा फडकणार असा विश्वास लातूर शहर जिल्हाध्यक्ष ॲड किरण जाधव यांनी व्यक्त केला आहे.
----------------------------------------
Previous Post Next Post