क्रुर..तेचा कहर 'प्रमोद डॉक्टर' अपहरण प्रकरण आणि आता हत्या..!
अपहरण, मारहाण कमी वाटली की काय..?आणि आता हत्या..!आयकॉन हॉस्पिटलच्या डॉक्टर प्रमोद घुगेवर हत्तेचा आरोप!
■ खून करून अपघाताचा बनाव करून आरोपी डॉक्टर घुगे सह अनिकेत मुंडे फरार.
■ कांही दिवसापूर्वी याच घुगेने लिफ्टचे काम करणाऱ्यांना अपहरण करून केली होती बेदम मारहाण
■ त्याच गुन्ह्यात असलेला मयत होता आरोपी,आणि आज त्याचीच हत्या..!
लातूर दि - लातूर शहरात उच्चभ्रु आणि पेशाने डॉक्टर असलेल्याने बाळू डोंगरे या कर्मचाराला मरे पर्यंत मारहाण करुन त्याला जिवे मारल्या प्रकरणी आयकाॅन हाॅस्पीटलचे किडनी स्पेशलिस्ट डॉ प्रमोद घुगे व अनिकेत मुंडे यांच्यावर नातेवाईकांच्या दबावानंतर गुन्हा दाखल करण्यात आल्याने लातूर मध्ये एकचं खळबळ उडाली आहे.आरोपी फरार असुन पुढील तपास शिवाजी नगर पोलिस करत आहेत.
मिळालेल्या माहिती नुसार काही महिण्यांपुर्वी अहमदपूर येथील एका लिफ्टच्या काम करणाऱ्या आनंद कोटंबे याचे अपहरण करून त्याला बेदम मारहाण करण्यात आली होती त्यावेळेस आत्ता मयत असलेल्या बाळू डोंगरे याला पुढे केले होते याच प्रकरणात मयत बाळ डोंगरे बुधवारी सांयकाळी 9 च्या सुमारास शहरातील यशोदा चित्रमंदिर समोर असलेल्या आयकॉन हॉस्पिटलमध्ये डॉक्टर प्रमोद घुगेकडे गेले.त्यांच्यात पैशाच्या देवाणघेवाणीवरून बाचाबाची
झाली त्यानंतर मयत बाळू डोंगरे याला सहाव्या मजल्यावर नेवून डॉ प्रमोद घुगे आणि अनिकेत मुंडे यांनी बेदम मारहाण केली त्यामुळे त्याचा जागीच मृत्यु झाला आणि तो लपवण्यासाठी त्याला आयसीयु मध्ये दाखल करुन आपघाता मुळे मृत्यु झाल्याचा बनाव करुन शिवाजी नगर पोलिस स्टेशन ला एन सी दाखल केली.नातेवाईकांनी बाळू डोंगरे चा मृतदेह पाहून त्यांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली कारण शरिरावर अनेक ठिकाणी मारहाणीचे वृण दिसुन येत होते यामुळे नातेवाईकांनी डॉ प्रमोद घुगेवर हत्येचा गुन्हा दाखल होत नाही तो पर्यंत मृत देह ताब्यात घेणार नाही अशी भुमिका घेतल्याने पोलिसांनी गुन्हा दाखल केला. या घटनेला घुगे याने अपघाताचे स्वरूप देत पळ काढला विशेष म्हणजे याप्रकरणी सीसीटीव्ही कॅमेरे देखील गायब असल्याचे सांगण्यात येते आहे..अशी क्रुर आणि मारहाण करुन हत्या करण्याची माणसिकता एका डॉक्टर मध्ये येणे हे समाजासाठी अत्यंत घातक तर आहेच परंतू अश्या डॉक्टर पासून पेशंट कसे वाचतील हे मात्र गंभीर आहे.अश्या क्रुर माणसिकतेच्या डॉक्टरला फाशीची शिक्षाही कमी पडेल अशी भावणा आता उत्पन्न होत आहे.
#photocrimenews #LaturCity #AmitDeshmukh #dheerajdeshmukh #EknathShinde #DevendraFadnavis #AjitPawar
![]() |
मयत- बाळू डोंगरे |
बाळू डोंगरे संशयास्पद मृत्यु प्रकरणी माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुखयांनी पोलीस प्रशासनाने तातडीने तपास करुन योग्य ती कायदेशीर कारवाईकरण्याच्या सुचना दिल्या, आणि डोंगरे कुटुंबीयाचे केले सांत्वन
लातूर प्रतिनिधी : शनीवार १४ डिंसेबर २४
लातूर शहरातील एक रुग्णालयातील कर्मचारी म्हणून कार्यरत असलेले बाळूडोंगरे यांचा संशयास्पद मृत्यु झाला. त्यांच्या नातेवाईकांनी बाळू डोंगरेयांचा मृतदेह पाहिला आणि त्यांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. कारण बाळूडोंगरे यांच्या शरीरावर अनेक ठिकाणी मारहाणीचे वळ दिसून येत होते. यामुळेनातेवाईकांनी गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही,अशी भूमिका घेतली. सदरील प्रकरणात पोलीस तातडीने कारवाई करीत नसल्यानेत्यांनी राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण सांस्कृतिक कार्यमंत्री व लातूरजिल्ह्याचे माजी पालकमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांच्याशी संपर्कसाधला. माजी मंत्री आमदार देशमुख यांनी पोलीस प्रशासनाने चालढकल न करतातातडीने तपास करुन योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याच्या सुचना दिल्या आणिडोंगरे कुटुंबीयाचे सांत्वन केले.
मराठवाडासह लातूर येथील कायदासुव्यवस्था गेल्या काही दिवसापासून बिघडतआहे. वेगवेगळया ठिकाणी अनेक दुदैवी घटना घडत आहेत. पण पोलीस प्रशासनाकडूनकडक पाऊले उचलतांना दिसून येत नाहीत. गेल्या दिवसापासून लातूरमध्येसुध्दा गंभीर घटना वाढल्या आहेत. अशातच लातूर शहरातील एक रुग्णालयातीलकर्मचारी असलेले बाळू डोंगरे यांचा संशयास्पद मृत्यु झाला. पोलीसांनीवेळेवर कार्यवाही न केल्यामुळे नातेवाईकांनी बाळू डोंगरे यांचा मृतदेहगुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिकाघेतली. डोंगरे कुटुंबीयानी पोलीस कोणतीच कारवाई करीत नाही यासाठीराज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण सांस्कृतिक कार्यमंत्री व लातूरजिल्ह्याचे माजी पालकमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांच्याशी संपर्कसाधला. परिस्थितीचे गाभीर्य ओळखून माजी मंत्री आमदार देशमुख यांनी पोलीसप्रशासनाने तातडीने तपास करुन योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याच्या सुचना
दिल्या.