Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

बसवेश्वर चौकात सतरा लाख रुपयांचा प्रतिबंधित गुटखा जप्त

गुन्हेगारीचा पर्दाफाश….!
बसवेश्वर चौकात सतरा लाख  रुपयांचा प्रतिबंधित गुटखा जप्त. 
पोलीस अधीक्षक श्री. सोमय मुंडे यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई.*


              
          या बाबत थोडक्यात हकीकत अशी की,पोलीस अधीक्षक श्री.सोमय मुंडे यांनी अवैध धंद्यावर कठोर कारवाई करण्याचे निर्देशित केले आहे. त्या अनुषंगाने अपर पोलीस अधीक्षक डॉ.अजय देवरे, यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले यांचे नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदारांचे पथक तयार करून लातूर जिल्ह्यातील अवैध धंद्याची माहिती काढून त्यावर कारवाई करण्याची मोहीम राबवित आहेत. 

         अवैध धंद्याची माहिती काढत असताना दिनांक 21/02/2024 रोजी सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास पोलीस पथकास खात्रीशीर माहिती मिळाली की, लातूर शहरातील बसवेश्वर चौकामध्ये एका वाहनांमध्ये काही इसम प्रतिबंधित गुटका व सुगंधित तंबाखूची चोरटी विक्री व्यवसाय करण्यासाठी वाहनातून घेऊन जाणार आहे.अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने सदर माहितीची शहानिशा करून स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस अधिकारी व अमलदारांच्या पथकाने दिनांक 21/02/ 2024 रोजी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास बसवेश्वर चौक रिंग रोड येथे सापळा लावून गुटख्याची वाहतूक करणाऱ्या वाहनास ताब्यात घेऊन पाहणी केली असता त्यामध्ये महाराष्ट्र शासनाने बंदी घातलेले वेगवेगळ्या कंपनीचे,महाराष्ट्र राज्यामध्ये विक्रीसाठी प्रतिबंधित असलेले गुटका व सुगंधित पानमसाला असा एकूण 11लाख 42 हजार 872 रुपयांचा प्रतिबंधित गुटका व सुगंधित पान मसाला तंबाखू व सदर मालाची वाहतूक करण्यासाठी वापरण्यात आलेली स्कार्पिओ कंपनीची सहा लाख रुपये किमतीची गाडी असा एकूण 17 लाख 42 हजार 872 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आले आहे.
               त्यावरून पोलीस ठाणे विवेकानंद चौक येथे प्रतिबंधित गुटका व सुगंधित तंबाखूची अवैधरित्या वाहतूक करीत असताना मिळून आलेले इसम नामे

1) उमर इस्माईल शेख,वय 34 वर्ष, राहणार खोरी गल्ली, लातूर.

2) शेख आफताब मेहमूद,वय 38 वर्ष,राहणार खोरी गल्ली, लातूर.

               गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस ठाणे विवेकानंद चौक पोलीस करीत आहेत.
               सदरची कामगिरी वरिष्ठांचे मार्गदर्शनात,स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले, यांचे नेतृत्वात सहाय्यक पोलीस निरीक्षक व्यंकटेश पल्लेवाड, पोलीस अमलदार राहुल सोनकांबळे, मोहन सुरवसे, नितीन कठारे, मनोज खोसे,राहुल कांबळे यांनी पार पाडली.

Post a Comment

You have in a dout late me know

Previous Post Next Post