लातूर प्रादेशिक परिवहन कार्यालय यांच्या वतीने रस्ता सुरक्षा अभियान जनजागृति
लातूर : लातूर प्रादेशिक परिवहन कार्यालय यांच्या वतीने
१५ जानेवारी ते १४ फेब्रुवारी या कालावधीत राज्यभर सुरक्षा अभियान पाळण्यात येतो या निमित्त रस्ते सुरक्षा विषयक मार्गदर्शन, प्रबोधन आणि जनजागृती करण्याच्या हेतूने परिवहन आयुक्त यांच्या सुचनेनुसार सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी आशुतोष बारकुल यांच्या मार्गदर्शनाखाली प्रादेशिक परिवहन विभाग लातूर येथे मोटर वाहन निरीक्षक शितल गोस्वामी व निरीक्षक संजय आडे यांनी सर्व वाहनांना सुरक्षा अभियान संदर्भा बद्दल माहिती असणारे पत्रक लावून चालकांना मार्गदर्शन केले.
यावेळी बोलताना मोटर वाहन निरीक्षक शितल गोस्वामी म्हणाल्या की,वाढती वाहन संख्या, रस्त्यांची दुरावस्था यामुळे होणाऱ्या अपघातांवर प्रकाश टाकत रस्ता सुरक्षा नियमांचे नागरिकांनी काटेकोरपणे पालन करावे