Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

तावरजा नदी पुलाजवळ ७ वर्षांच्या अनोळखी मुलाचा मृतदेह सापडला; लातुरमधील घटना

गुन्हेगारीचा पर्दाफाश….!
तावरजा नदी पुलाजवळ ७ वर्षांच्या अनोळखी मुलाचा मृतदेह सापडला; लातुरमधील घटना



 
लातूर : लातूर शहरापासून जवळच असलेल्या पेठ येथील तावरजा नदीच्या पुलाच्या लगत एका ७ ते ८ वर्षीय अनोळखी मुलाचा मृतदेह १७ जानेवारी रोजी सायंकाळी ६.३० वाजण्याच्या सुमारास सापडल्याने लातूर शहरामध्ये एकच खळबळ उडाली आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी लातूरच्या  शासकीय वैद्यकीय रुग्णालयात रात्री आणण्यात आला असून.
शवविच्छेदनानंतरच या मुलाच्या मृत्यूचे कारण समोर येणार आहे.दरम्यान अनोळखी मुलाच्या मृतदेहाबाबत पोलिसांनी सांगितले की, मुलाचा मृतदेह तावरजा नदीच्या लगत होता. रस्त्याची कामे करणा-या मजुरास मृतदेह दिसला त्यांनी पोलिसांना कळवले. मुलगा कुपोषित, आजारी असून या मुलाच्या मृतदेहावर कुठलीही जखम नाही. हा मुलगा बहुतेक बाहेर गावाहून आलेल्या मजुरांचाच असावा. आजाराने मृत्युमुखी पडल्यामुळे तावरजा नदीच्या लगत ठेवून पालक निघून गेले असावेत. सदर मुलाचा आजाराने मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक अंदाज डॉक्टरांनी व्यक्त केल्याचे  सांगितले आहे.

Post a Comment

You have in a dout late me know

Previous Post Next Post