Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

IPS निकेतन कदम ...याच्या बदलीनंतर, अवैध धंदेवाल्यांनी काढले डोके वर! नावालाच आहे गुटखा "बंदी" या मध्ये अन्न सुरक्षा अधिका-याची होते"चांंदी'

गुन्हेगारीचा पर्दाफाश….!
IPS निकेतन कदम ...याच्या बदलीनंतर, अवैध धंदेवाल्यांनी काढले डोके वर!
नावालाच आहे गुटखा "बंदी" या मध्ये अन्न सुरक्षा अधिका-याची होते"चांंदी'
एफ.डी.ए.चा "विठुराया" गप्प का ??
कमलनगर ते शिरुर ताजबंद येथे गुटखा वाहतूक व विक्री सुसाट




लातूर~ राज्यात बंदी असलेला गुटखा व सुंगधी जर्दा याची लातूर शहरातचं नव्हे तर खेड्यापाड्यांनी सुध्दा खुल्लमखुल्लां विक्री होताना सर्वसामान्य नागरिकांना दिसते. माञ संबंधित अन्न व औषध सुरक्षा FDA अधिकारी व पोलिस महाशयाला दिसत नाही.का?लातूर शहरात जागोजागी पानटपरी धारकांकडून आणि पान मटेरियल वाल्यांकडून अवैध गुटखा विक्री जोमात चालू असून याला
काही अन्न सुरक्षाधिकारी आणि  काही पोलिस अधिकार्यांची  आर्थिक "चांदी" होते की काय?असा प्रश्न सर्वसामान्य जनतेकडून उपस्थित होवू लागला आहे.
त्यातच ज्या खात्यावर याची जिम्मेदारी आहे ते म्हणजे
  FDA अन्न व औषध खाते सध्या मुग गिळून गप्प आहे. 
अशा या अन्न औषध  "विठुराया"ची या गोरख धंद्या ला मुक संमती असल्याची चर्चा जनतेतुन होत आहे.म्हणुन "असे रे कसे गुटखा बंदी ; तुझे अन्न सुरक्षा अधिका-यानीच केले हसे" असे म्हणने चुक ठरु नये.कारण या धंद्यावर कारवाहीचे अधिकार असुनही अद्याप एकदा पण संबंधीत FDA च्या अधिका-यानी ह्या भागात कारवाही केल्याचे ज्ञात नाही.FDA च्या सं.अधिका-यात "दमखम" नाही. म्हणुनच कर्नाटक या पर राज्यातुन लातूर सह शिरुर ताजबंद या गावात राजरोसपने प्रतिबंधित असलेला गुटखा,सुंगधित तंबाखु,जर्दा याची वाहतूक व विक्री करणारे वाहन,गाडी सुसाटपणे धावते ते पण उदगीर शहर मार्गे कधी हाळी मार्गे तर हेर व कधी जळकोट मार्गे शिरुर ताजबंद येथे गुटखा वाहतूक व विक्री करणारी गाडी विना अडथळा जाते.
तसेच हे गुटखा किंग कधी नंबरची तर कधी विनानंबरची गाडी मधून गुटख्याची तस्करी करतात. तसेच i.p.s.पोलीस अधिकारी श्री. निकेतनजी कदम हे जेवढे वर्षे लातुर जिल्ह्यात ड्यूटीवर होते तो पर्यंत अशा अवैध धंद्यावर आणि गुटखा विक्री वर लगाम लागला होता परंतू त्यांची नुकतीच बदली झाल्याचे कळल्यावर अशा अवैध धंदेवाल्यांनी आता डोके वर काढले आहे.

त्यातच आता शिरूर मधील गुटखा तस्कर हा पुन्हा गुटखा विकण्यासाठी "रेडी" झाला आहे.व रोज लाखोंचा गुटखा सरेआमपणे विकत आहे.अशी चर्चा शिरुर ताजबंद सह हंडरगुळी परिसरात ऐकू येत आहे.... तेंव्हा या गुटखा तस्करावर कारवाही करण्यासाठी अन्न सुरक्षा अधिकारी व पोलिस कर्मचारी हे "रेडी" आहेतका?व संबंधित अन्न सुरक्षाधिकारी यांच्यात गुटखा तस्करावर कारवाई करण्याची"धमक' आहे.का?असे प्रश्न जनतेतून चर्चीले जात आहेत...

Post a Comment

You have in a dout late me know

Previous Post Next Post