Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

नरेंद्रजी मोदी यांच्‍या नेतृत्‍वावर तरुणांचा मोठा विश्‍वास- आ. कराड

नरेंद्रजी मोदी यांच्‍या नेतृत्‍वावर तरुणांचा मोठा विश्‍वास- आ. कराड
रेणापूर तालुका भाजयुमो नूतन पदाधिकाऱ्यांना आ. रमेशआप्पा कराड यांच्या हस्ते नियुक्ती पत्र वाटप







         लातूर दि.०९- युवा मतदारांची संख्‍या मोठया प्रमाणात आहे. देशाचे यशस्‍वी पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांच्‍या नेतृत्‍वावर तरुणांचा विश्‍वास असल्‍याने या सर्व तरुणांना भाजपाच्‍या प्रवाहात घेवून लातूर ग्रामीण मतदार संघातून लोकसभा निवडणूकीत भाजपा उमेदवाराला पन्‍नास हजाराहून अधिक मताधिक्‍य मिळावे यासाठी भारतीय जनता युवा मोर्चाच्‍या कार्यकर्त्‍यांनी मेहनत घ्‍यावी असे आवाहन भाजपाचे नेते आ. रमेशआप्पा कराड यांनी रेणापूर तालुका भाजयुमोच्‍या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्राचे वाटप प्रसंगी केले.

        लातूर येथील भाजपाच्या संवाद कार्यालयात रेणापूर तालुका भाजयुमोच्‍या नूतन पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्राचे वाटप भाजपा नेते आ. रमेशअप्‍पा कराड यांच्‍या शुभहस्‍ते करण्‍यात आले. यावेळी भाजपाचे विक्रमकाका शिंदे, नवनाथ भोसले, लातूर ग्रामीण अध्यक्ष अनिल भिसे, लातूर तालुकाध्यक्ष बन्सी भिसे, रेणापूर तालुका अध्यक्ष दशरथ सरवदे, संजय गांधी निराधार योजना समिती लातूर तालुका अध्यक्ष वैभव सापसोड, रेणापूर तालुका अध्यक्ष वसंत करमुडे, रेणापूर तालुका भारतीय जनता युवा मोर्चाचे अध्यक्ष अमर चव्हाण यांच्‍यासह अनेकांची प्रमुख उपस्थिती होती.

          लातूर ग्रामीण मतदार संघात केंद्र आणि राज्‍य शासनाच्‍या माध्‍यमातून विकासाच्‍या अनेक योजना मोठया प्रमाणात राबविल्‍या जात असून शासनाच्‍या विविध योजनांची माहिती गरजू, गोरगरीब सर्व सामान्‍यांना पर्यंत पोहंचवावी असे सांगून आ. रमेशअप्‍पा कराड म्‍हणाले की, येणाऱ्या लोकसभा, विधानसभेसह स्‍थानिक स्‍वराज्‍य संस्‍थेच्‍या निवडणूकीसाठी जिद्दीने जोमाने काम करुन भाजपाच्‍या उमेदवाराला मताधिक्‍य मिळवून देण्‍यासाठी भाजयुमोच्‍या कार्यकर्त्‍यांनी मेहनत घ्‍यावी असे आवाहन केले तर तालुका अध्‍यक्ष अॅड. दशरथ सरवदे यांनी भाजयुमोच्‍या कार्यकर्त्‍यांवर मोठी जबाबदारी असल्‍याने पक्षाचे सर्व कार्यक्रम प्रभाविपणे यशस्‍वी करावेत असे सांगितले.

          भाजपाचे नेते आ. रमेशआप्पा कराड यांच्या हस्ते भाजयुमोचे नूतन पदाधिकारी उपाध्यक्ष हाजी सजन शेख, शरद राऊतराव, अँड प्रसाद माने, काशिनाथ सांगळे, भगवान करमुडे, अविनाश कापसे, प्रवीण शिंदे, विनोद रायमुळे, गोकुळ सुरवसे, कोंडीबा केंद्रे, सरचिटणीस - दीपक पवार, अविनाश रणदिवे, संतोष घुले, दयानंद बानापुरे, योगेश पनगुले, अमर माने, नरेश चपटे, अमोल बिडवे, चिटणीस - महेश सुडे, सतीश पाटील, महादेव उगिले, आबासाहेब शिरसाट, संगमेश्वर जमदरे, दीपक मुंडे हनुमंत साळुंखे कोषाध्यक्ष जयराम जाधव यांच्यासह इतर कार्यकारिणीतील सदस्यांना नियुक्ती पत्राचे वाटप करून त्यांना पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चंद्रकांत कातळे यांनी केले. यावेळी भाजपाचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी कार्यकर्ते, मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

You have in a dout late me know

Previous Post Next Post