Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

मणिपूरच्या प्रकरणात.. महिलांची विवस्त्र धिंड काढल्या प्रकरणी सातव्या आरोपीला अटक

गुन्हेगारीचा पर्दाफाश….!
मणिपूरच्या प्रकरणात.. महिलांची विवस्त्र धिंड काढल्या प्रकरणी सातव्या आरोपीला अटक


मणिपूरच्या प्रकरणात आता पोलिसांनी सातव्या आरोपीला अटक केली आहे.मणिपूरमध्ये दोन महिलांना विवस्त्र करुन त्यांची धिंड काढण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडल्याचा व्हिडीओ मागच्या बुधवारी व्हायरल झाला. त्यानंतर पोलिसांनी मागच्या गुरुवारी पहिल्या आरोपीला अटक केली. आता पोलिसांनी या प्रकरणातल्या सातव्या आरोपीला अटक केली आहे. तसंच पोलिसांकडून या व्हिडीओत दिसणाऱ्या आरोपींचा तपास केला जातो आहे त्यासाठी शोध मोहीम सुरु आहे. आत्तापर्यंत अटक करण्यात आलेल्या सात आरोपींपैकी एकजण अल्पवयीन आहे अशीही माहिती समोर आली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींच्या चौकशीच्या आधारे पोलीस इतर आरोपींना अटक करत आहेत.

मणिपूरमध्ये दोन महिलांची विवस्त्र धिंड काढण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार ४ मे २०२३ ला घडला. या घटनेचा व्हिडीओ जेव्हा व्हायरल झाला तेव्हा देशभरात त्याचे पडसाद उमटले. एवढंच नाही तर संसदेतही त्यावरुन विरोधक चांगलेच आक्रमक झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याबाबत मौन बाळगू नये अशी भूमिका विरोधकांनी घेतली आहे. आता या प्रकरणात सातव्या आरोपीला अटक करण्यात आली असल्याचे समोर आले आहे याबाबत NDTV ने या विषयीचं वृत्त दिलं आहे.



Post a Comment

You have in a dout late me know

Previous Post Next Post