Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

लातूर जिल्ह्यातून सराईत गुन्हेगारांची आणखीन एक टोळी हद्दपार.

गुन्हेगारीचा पर्दाफाश….!
लातूर जिल्ह्यातून सराईत गुन्हेगारांची आणखीन एक टोळी हद्दपार. 
पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांनी काढले हद्दपारिचे आदेश

         याबाबत याबाबत थोडक्यात माहिती अशी की, विवेकानंद चौक पोलिस ठाण्याच्या हद्दीत वारंवार गुन्हे करणाऱ्या व टोळीने राहणाऱ्या सराईत गुन्हेगारांविरुद्ध हद्दपारीची कारवाई करण्यात आली आहे. 

            आगामी सण उत्सवाच्या अनुषंगाने जिल्ह्यात शांतता अबाधित राहावी सराईत गुन्हेगाराकडून कोणत्याही प्रकारचे गैरकायदेशीर कृत्य घडू नये याकरिता विवेकानंद चौक पोलीस ठाण्याच्या हद्दीत वारंवार गंभीर स्वरूपाचे गुन्हे करून नागरिकांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या टोळी मधील गुन्हेगारांना एक वर्षासाठी हद्दपार करण्यात आले आहे.
           सदर गुन्हेगारांच्या टोळीचे अभिलेख पाहता टोळी विरुद्ध जबरी चोरी, घरफोडी करणे, घरात घुसून दुखापत करणे, घातक शस्त्राने जबर दुखापत करणे, बेकायदेशीर जमावत सामील होणे, आजन्म कारावास किंवा अन्य कारावासाच्या शिक्षेस पात्र असलेले गुन्हे करणे, शांतता भंग करणे तसेच शरीराविरुद्ध, मालाविरुद्ध चे गुन्हे करणे इत्यादी प्रकारचे एकूण सात गुन्हे पोलीस ठाणे विवेकानंद चौक येथे दाखल असून सदर टोळी कडून एखादा गंभीर दखलपात्र गुन्हा घडून मालमत्तेस किंवा व्यक्तीस धोका इजा होऊन कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची दाट शक्यता असल्याने टोळीप्रमुख 
1) ईश्वर गजेंद्र कांबळे ,वय 21 वर्ष
2) महादेव अशोक पाटोळे, वय 22 वर्ष
3) विकी गजेंद्र कांबळे, वय 21 वर्ष
4) अजय उर्फ विजय संतोष चव्हाण ,वय 22 वर्ष
5) गोविंद रमेश शिंदे, वय 22 वर्ष
                 सर्व राहणार जय नगर, लातूर.  
                 यांना असून आगामी काळात साजरे होणारे सण-उत्सव व येणारे काळात होऊ घातलेल्या निवडणुकांचे अनुषंगाने त्यांचे विरुद्ध महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 55 प्रमाणे कार्यवाही करून दिनांक 25/07/2023 रोजी पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांनी हद्दपारिचे आदेश पारित करून नमूद तारखेपासून सदरचे सराईत गुन्हेगार हे लातूर, नांदेड, बीड ,उस्मानाबाद व परभणी या पाच जिल्ह्यातून एक वर्षासाठी हद्दपार करण्यात आले आहेत. 
                   हद्दपार केलेल्या नमूद गुन्हेगारांना विवेकानंदचौक पोलिसांनी हद्दपार क्षेत्राचे बाहेर नेऊन सोडण्याची कार्यवाही सुरू आहे.
               सदरचा प्रस्ताव तयार करणे कामी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक गजानन भातलवंडे, पोलीस अंमलदार प्रदीप स्वामी, पोलीस ठाणे विवेकानंद चौक पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर व त्यांच्या टीमने परिश्रम घेतले आहे.
                          सदर कारवाईच्या माध्यमातून गुन्हेगारी कृत्य करणाऱ्या सराईत गुन्हेगार,उपद्रवी लोकांवर जरब बसून सराईत गुन्हेगारांची टोळी जिल्ह्यातून हद्दपार केल्यामुळे इतर गुन्हेगारी कृत्य करणाऱ्यां गुन्हेगारांना चांगलाच दणका बसला आहे.

Post a Comment

You have in a dout late me know

Previous Post Next Post