Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले तपघाले कुटुंबियांचे सांत्वन

केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले तपघाले कुटुंबियांचे सांत्वन



लातूर दि. 15 (जिमाका): केंद्रीय सामाजिक न्याय व सशक्तीकरण विभागाचे राज्यमंत्री रामदास आठवले यांनी रेणापूर येथील दिवंगत गिरीधर तपघाले यांच्या कुटुंबियांची भेट घेवून सांत्वन केले.

समाज कल्याण सहायक आयुक्त शिवकांत चिकुर्ते, उपविभागीय अधिकारी अविनाश कोरडे, तहसीलदार धम्मप्रिया गायकवाड यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.

दिवंगत गिरीधर तपघाले यांच्या आई, भाऊ, पत्नी, मुले व कुटुंबातील इतर सदस्यांकडून राज्यमंत्री श्री. आठवले यांनी संपूर्ण घटनेची माहिती घेतली. ही घटना अतिशय दुर्दैवी असून दोषींना कठोर शिक्षा मिळणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

सामाजिक न्याय विभागामार्फत तपघाले कुटुंबाला चार लाख अठरा हजार रुपये मदत देण्यात आली असून उर्वरित चार लाख रुपयेही लवकरच देण्यात येतील. तसेच याव्यतिरिक्त आणखी शासकीय मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे केंद्रीय राज्यमंत्री श्री. आठवले यांनी सांगितले. तपघाले कुटुंबासाठी घरकुलाबाबतही त्यांनी उपविभागीय अधिकारी व तहसीलदारांना सूचना केल्या.

Post a Comment

You have in a dout late me know

Previous Post Next Post