Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

मोदी सरकारकडून पुन्हा नोटाबंदी!2000रु च्या नोटा बंद


 मोदी सरकारकडून पुन्हा नोटाबंदी!2000रु च्या नोटा बंद




भारतीय रिझर्व्ह बँकेने मोठा निर्णय घेतला आहे. आरबीआयने बाजारातून दोन हजार रुपयांच्या नोटा मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. 30 सप्टेंबरपर्यंत या नोटा वापरता येणार असल्याचे आरबीआयने म्हटले आहे. 2018-19 मध्येच या नोटांची छपाई थांबवण्यात आली होती. नागरिकांना दोन हजार रुपयांच्या नोटा बदलून घेण्यासाठी 3 महिन्यांचा कालावधी आहे. आरबीआयच्या माहितीनुसार, 2000 रुपयांच्या नोटा मागे घेण्याची घोषणा केली असली तरी सध्या बाजारात असलेल्या 2 हजार रुपयांच्या नोटा व्यवहारासाठी वापरता येणार आहेत. या नोटा 30 सप्टेंबरपर्यंत वैध राहणार आहेत. तोपर्यंत ज्यांच्याकडे दोन हजार रुपयांच्या नोटा आहेत, त्यांनी बँकेकडून नोटा बदलून घ्याव्या लागणार आहेत.
Previous Post Next Post