Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

लातूर येथे सुराज्य अभियानाच्या अंतर्गत १० रुपयांची नाणी स्वीकारावीत यासाठी जिल्हा प्रशासनाकडे निवेदन सादर !

लातूर येथे सुराज्य अभियानाच्या अंतर्गत  १० रुपयांची नाणी स्वीकारावीत यासाठी जिल्हा प्रशासनाकडे निवेदन सादर !


 *लातूर* -  भारतीय चलनात भारतीय रिझर्व्ह बँकेने लागू केलेली १० रुपयांची नाणी काही ठिकाणी स्‍वीकारण्‍यास नकार दिला जात आहे, अशा तक्रारी जिल्‍हा प्रशासनाकडे प्राप्‍त झाल्‍या आहेत. लातूर येथील दुकानदार, बस वाहक, किरकोळ विक्रेते, रिक्शा चालक, बँक या ठिकाणी १० रुपयांची नाणी स्वीकारली जात नाहीत. यामुळे नागरिकांना पुष्कळ गैरसोय आणि मनस्ताप सहन करावा लागत आहे. या परिस्थितीत सुधारणा व्हावी, तसेच १० रुपयाचे नाणे वापरण्याविषयी असलेले अपसमज दूर व्हावेत यासाठी हिंदु जनजागृती समितीने सुराज्य अभियानाच्या अंतर्गत प्रशासन आणि समाज यांना साहाय्य होण्यासाठी जिल्ह्यातील अग्रणी बँक, लातूर येथील निवासी उपजिल्हाधिकारी विजयकुमार ढगे यांना निवेदन देण्यात आले, तसेच रिझर्व्ह बँकेचे संबंधित प्रसिद्धीपत्रक ट्वीटर हँडलवरून जागृतीसाठी प्रसिद्धही केले आहे. 

              निवेदनात म्हटले आहे की, रिझर्व बँकेने यासंदर्भात जनतेमध्ये जागृती होण्यासाठी १७ जानेवारी २०१८ या दिवशी ‘१० रुपयांची नाणी पूर्णपणे कायदेशीर चलन असून नागरिकांनी ते स्वीकारायला हवे’, अशा आशयाचे प्रसिद्धीपत्रक काढलेले आहे. त्यामुळे १० रुपयांची नाणी स्‍वीकारणे बंधनकारक असून भारतीय रिझर्व्ह बँकेने दिलेल्‍या मार्गदर्शक तत्त्वांनुसार अशा प्रकारे १० रुपयांचे नाणे स्‍वीकारण्‍यास नकार देणार्‍या व्‍यक्तीविरुद्ध गुन्‍हा नोंद होऊन तो शिक्षेस पात्र ठरू शकतो.  


*निवेदनात करण्यात आलेल्या मागण्या...*

१. जिल्हा प्रशासनाकडून हस्तपत्रके, ‘स्टीकर्स’ आणि अन्य माध्यमांतून दुकाने, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था यांठिकाणी १० रुपयांची नाणे स्वीकारण्यासाठी जागृती करण्यात यावी. 
२. नाणी स्वीकारण्यास नकार दिल्यास त्यांच्याविरोधात ‘ऑनलाईन’ तक्रार नोंदवण्यासाठी हेल्पलाईनची सुविधा उपलब्ध करून द्यावी. 
३. सर्वसामान्य जनतेचा १० रुपयांची नाणी वापरण्याच्या अधिकाराविषयी वृत्तपत्रे, स्थानिक वृत्तवाहिन्या, होर्डिंग, सामाजिक प्रसार माध्यमे, मोबाईल कॉलर ट्यून यांमाध्यमातून व्यापक प्रसिद्ध करावी. 

आपला विश्वासू 
श्री. दत्तात्रय पिसे, 
समन्वयक, ‘सुराज्य अभियान’
संपर्क क्र. : ९९२२६६४४६६

Post a Comment

You have in a dout late me know

Previous Post Next Post