वाले इंग्लिश स्कूलमध्ये विज्ञान प्रदर्शन
लातूर : येथील वाले इंग्लिश स्कूलमध्ये विज्ञान प्रदर्शन पार पडले. विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन आळंदकर यांच्या हस्ते झाले.
विज्ञान प्रदर्शनात विविध विषयांवरील विज्ञान प्रयोगांचे सादरीकरण विद्यार्थ्यांनी केले. विद्यार्थ्यांत वैज्ञानिक जाणीव जागृती व्हावी, या उद्देशाने विज्ञान प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. विविध शास्त्रज्ञांनी लावलेले शोध या संदर्भाने विद्यार्थ्यांनी मांडलेल्या विज्ञान प्रयोगांची पाहणी करताना शिक्षकांनी विद्यार्थ्यांना प्रयोगाविषयी माहिती विचारली. विद्यार्थ्यांनी आपल्या प्रयोगांची
माहिती उपस्थितांना सांगितली. प्रदर्शनातील मकरंद सावे, विज्ञान विभाग प्रमुख आळंदकर प्रयोगांची पाहणी शाळेचे प्राचार्य भोगडे यांनी करून विद्यार्थ्यांचे कौतुक केले.यावेळी विज्ञानप्रदर्शनाबद्दल संजिवनी आष्टीकर मॅडम व कांचन दुडिले मॅडम या शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.