Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

लातूर आर.टी.ओ. कार्यालयामध्ये लागली भ्रष्टाचाराची किड 'थोर'अधिकारी झाला चोरावर मोर

गुन्हेगारीचा पर्दाफाश….!
लातूर आर.टी.ओ. कार्यालयामध्ये लागली भ्रष्टाचाराची किड
'थोर'अधिकारी झाला चोरावर मोर

लातूर-लातूर मध्ये अधिकार्यांनी सध्या जणतेला लुटण्याचे जणू प्रमाणपत्र च मिळविले आहे कि काय आशाप्रमाणे आर टी ओ कार्यालयामध्ये असलेल्या एका चोरावर मोर झालेल्या'थोर'अधिकार्याला वाटत आहे.सर्व सामान्य नागरिकांना ताटकळत ठेवून स्वत:बारा वाजता कार्यलयामध्ये येत असून गाड्यांच्या रजिस्ट्रेशन च्यानावाने एजंटामार्फत २००ते ५०० रुपये गोळा करत असल्याची जोरदार चर्चा सध्या कार्यालयामध्ये होवू लागली आहे 
लातूर परिवहन कार्यालय मागील काही महिन्यांपासून तेथील एजांटांमुळे बदनाम होत चालले असताना त्याचा फटका उप प्रादेशिक परिवहन अधिकारी भोये यांना बसत आहे किंबहुना त्यांनी अशा अधिकारी आणि एजंटांना कार्यालयात  सुट दिल्या कारणाने ते अधिकार्यांच्या वरचड झाले आहेत.विशेष म्हणजे हे अधिकारी एजंटांच्या नावाने सर्वसामान्य जनतेकडून सर्रास पैसे उकळत आहेत.एजंटासोबत काही अधिकारी कर्मचार्यांची मिलीभगत असल्याकारणाने सर्वसामान्य जनतेची लुट मात्र थांबताना दिसत नाही.असाच या अधिकार्यांचा फटका काही ट्रॅव्हल्स मालकांना बसल्यामुळे लातूर जिल्हा ट्रॅव्हल्स असोसिएशनच्या वतीने प्रादेशिक परिवहन अधिकारी गजानन नेरपगार यांना लातूरच्या प्रादेशिक परिवहन कार्यालयात दलालांमार्फत होत असलेली आर्थिक लूट त्वरित थांबवावी यासाठी निवेदन देण्यात आले होते परंतू आशा निवेदनाला केराची टोपली दाखवून हा अधिकारी गाङया रजिस्ट्रेशन च्यानावाने सर्रास पैशे उकळत आहे.अशा या मुजोर आणि भ्रष्ट अधिकार्याला वेळीच थांबले नाही तर तो चोरावर मोर होवून लातरच्या बदनामीला कारणीभुत ठरु शकतो ,सध्या संपुर्ण महाराष्ट्रात गाजत असलेल्या जिल्हाधिकार्यालयातील एका कारकुनाने केलेल्या २२करोड च्या घोटाळयाने संपुर्ण जिल्हाधिकारी कार्यालय बदनाम होत आहे.आणि आता आरटीओ काार्यालय त्यामुळे अशा भ्रष्ट आणि मुजोर अधिकार्यावर भोये साहेबांनी कडक कार्यवाही करावी अशी मागणी आता सर्वसामान्य जनतेकडून व्यक्त होत आहे

Post a Comment

You have in a dout late me know

Previous Post Next Post