Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

यशवंत नागरी सहकारी बँक विकास पॅनलच्या प्रमुखपदी वसंतराव पाटील

888
यशवंत नागरी सहकारी बँक विकास पॅनलच्या प्रमुखपदी वसंतराव पाटील



लातूर : यशवंत नागरी सह. बँकेच्या २०२३ ते २०२८ पंचवार्षिक निवडणूक जाहीर झाली असून यासाठी ११ फेब्रुवारी २०२३ रोजी मतदान होणार आहे. त्या करिता यशवंत नागरी सह. बँक विकास पॅनलच्या प्रमुखपदी सर्वानुमते आदर्श शिक्षक पुरस्कार विजेते श्री. वसंतराव गुणवंतराव पाटील यांची निवड करण्यात आली आहे.

याबद्दल त्यांचा शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. साठे कॉम्प्लेक्स दयानंद गेट खाडगाव रोड लातूर येथे प्रचार कार्यालयाचे उद्घाटन व बैठक पार पडली. या प्रसंगी विद्यमान चेअरमन श्री. विष्णुपंत साठे, श्री. राजगोपालजी सारडा, श्री. सुर्यभान

पाटील, अॅड. सुनिल शिंदे, विद्यमान व्हा. चेअरमन श्री. सुरेश राठोड, श्री. गोविंद हालसे, श्री भालचंद्र कदम, श्री. चंद्रकांत साळुंके, अॅड. राहूल विहीरे श्री. शिवाजी जवळगेकर, श्री. सिताराम मारुती पवार, श्री. अक्षय शेरे, श्री. चंद्रकांत काशीनाथराव साळुंके, श्री. संजयकुमार वर्मा, सय्यद अन्वर उमरसाब, सौ. सुजाता भालचंद्र कदम, सौ. सपना राजगोपालजी सारडा, सौ. कमल गोविंदराव हालसे, आदी उपस्थित होते. यशवंत नागरी सहकारी बँकेस मानाचा बॅको ब्ल्यू रिबन २०२१ व २०२२ हा पुरस्कार दुसऱ्यांदा प्राप्त झाला आहे. 'ग्राहक संपर्क अभियान' राबविणारी ही बँक मराठवाड्यातील पहिली आहे.
888

Post a Comment

You have in a dout late me know

Previous Post Next Post