गुन्हेगारीचा पर्दाफाश….!
श्रावणी नाईकनवरे आत्महत्या प्रकरणात.. आरोपीला तात्काळ अटक करून किडीस इन्फो पार्क,लातूर या शाळेची मान्यता रद्द करावी..!
मुलीच्या आई वडिलांनी पत्रकार परिषद घेवून केली मागणी
लातूर-
श्रावणी नाईकनवरे आत्महत्या प्रकरणात आरोपीला तात्काळ अटक करून किडीस इन्फो पार्क,लातूर या शाळेची मान्यता रद्द करावी यासाठी मुलीच्या आई वडिलांनी शनिवार दि.28 जानेवारी रोजी पत्रकार परिषद घेवून मागणी केली,तसेच आरोपी ला अटक नाही झाल्यास तिव्र आंदोलन करण्याचा ईशाराही देण्यात आला आहे.
श्रावणी ही किडीस इन्फो पार्क, लातूर शाळेत ९वि वर्गात होती, तिला वर्गात शिकवणारे गणिताचे शिक्षक राहुल जे पवार याकडे तिचे जुन २०२२ मध्ये खासगी ट्युशन वर्ग होते परंतु त्यांची शिकवणी समजत नसल्यामुळे श्रावणीला दुसरीकडे ट्युशन वर्ग लावले श्रावणी ने घरी सांगितले की राहुल जे पवार सर त्यांच्याकडे जे मुले ट्युशन ला जाता त्यांना विशेष लक्ष देतात परंतु त्यांच्याकडे ट्युशन ला जे मुले नाहीत त्यांना टार्गेट करून टोन्ट मारून अपमानस्पद वागणूक देतात. जुलै २०२२ मध्ये शाळेतील युनिट टेस्ट मध्ये social science च्या पेपर दरम्यान social science चे शिक्षक चौधरी सरांनी तिला कॉपी करतांना पकडून प्रिन्सिपॉल प्रीती शाह कडे घेऊन गेले व तिला समज देण्यात आली. हि काही बोर्डाची परीक्षा नव्हती परंतु या घटनेनंतर तिला अपराध्यासारखे वाटू लागून, ती घरात कमी बोलू लागली आणि शाळेत पण गैरहजर राहू लागली. मी श्रावणीला सातत्याने महिनाभर समजून सांगितल्यावर श्रावणी • त्यातून ती सावरली.
परंतु दि २४/०८/२०२२ रोजी श्रावणी हिने शाळेतून घरी आल्या नंतर तिच्या आई ला रडत रडत सांगितले कि गणिताचे शिक्षक राहुल पवार यांनी बोर्डवर गणिताचा प्रॉब्लेम देऊन तिला "ए कॉपी करणे वली लडकी तू बता असे वर्गासमोर बोलून अपमानित केल, तरी ही तिने बरोबर उत्तर देऊन तिच्या उत्तराकडे दुर्लक्ष करून ज्यांनी चुकीचे उत्तर दिली त्यांना वर्गाबाहेर जा अशे म्हणून श्रावणी ला पण वर्गाबाहेर काढले श्रावणी रडू लागल्याने "ए ड्रामेबाज लडकी अंदर आजा" असा पस्त अपमान करत तिला वर्गात बोलावले कॉपी प्रकरणाचा आणि राहुल पवार यांच्या विषयाचा काही एक संबंध नसतांना जाणीव पूर्वक अपमान केल्याचे तिने मला सांगितले. मी व ती चे वडील प्रिन्सिपॉल प्रीती शहा आणि क्लास टीचर चौधरी यांच्याकडे जाऊन राहुल पवार यांची तक्रार केली होती. परंतु राहुल पवार यांच्या वागण्यात कसलाही फरक पडला नव्हता. किडीस इन्फो शाळेच्या प्रिन्सिपॉल यांनी कॉपी प्रकरण संवेदनशीलपणे न हाताळल्या मुळे आणि शिक्षक राहुल पवार यांचा कॉपी प्रकरणाचा संबंध नसताना त्यांनी क्लास मध्ये केलेल्या अपमाना मुळे माझ्या मुलीने आत्महत्या सारखे टोकाचे पाऊल उचलले.
आज दि २८/०१/२०२३ रोजी १० दिवस झाले तरीही पोलिसांनी आरोपी शिक्षक राहुल पवार याला आजून अटक केले नसून तो फरार आहे. आरोपी ला फरार होण्यासाठी किडीस इन्फो शाळेच्या प्रिन्सिपॉल हिच मदत करत आहे असा आमचा संशय आहे. आरोपी शिक्षक राहुल पवार यास अजून पोलिस अटक करू शकले नाही याबद्दल पोलिसांनी हे आमचे अपयश हे कबूल केले. आई म्हणून अजून मी किती दिवस वाट पाहावी ?
या संदर्भाने शिवाजी नगर पोलीस ठाणे इथे गुन्हा रजिस्टर नं. ००२५/२०२३ कलम भादवि ३०६ अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे.
१. सुरुवातीला गुन्हा दाखल करायला टाळाटाळ झाली परंतु, आठ तासानंतर नंतर गुन्हा दाखल झाला, १९/२/२३ रोजी आम्ही रात्री दोन वाजे पर्यंत पोलीस स्टेशन ला होतो.
२. किडीस इन्फो शाळेच्या प्रिन्सिपॉल आणि गणित शिक्षक या दोघांबद्दल आम्ही पोलिसांना सांगितले होते परंतु शिवाजी नगर पोलीस स्टेशनने फक्त शिक्षका लाच आरोपी केले दिसल्यानंतर आम्ही SP मुंढे साहेबांना प्रिन्सिपॉल बद्दल तक्रार केली. शाळेतील शिक्षकांना खाजगी ट्युशन घेता नाहीत असे असताना पण प्रिन्सिपॉल ने त्यांच्यावर कधी प्रतिबंध घातला नाही. शाळेच्या प्रिन्सिपॉल यांनी कॉपी प्रकरण संवेदनशीलपणे हाताळले नाही. शिक्षक राहुल पवार, याच्या बदल आम्ही कॉपीगर्ल म्हणल्या दिवशीच प्रिन्सिपॉल यांना भेटलो पण त्यांनी काहीहि केले नाही. या नंतर 2023 0 साहेबानी आमची कच्चा पुरवणी जबाब घेतला आहे. परंतु तो अजून पक्का केला नाही.'
३. शिवाजी नगर पोलीस स्टेशन जर आरोपीला अटक करू शकले नाही आणि त्यामुळे गुन्ह्याचा तपास शिवाजी नगर पोलीस स्टेशन कडून स्थानिक गुन्हे शाखेकडे द्यावा अशी विनन्ती आपल्या माध्यमातून मी SP साहेबाना करू इच्छितो
हि घटना घडल्यानंतर किडीस इन्फो पार्क या शाळेने या घटनेबाबत शाळेची भूमिका मांडणे तसेच शिक्षक राहुल पवार याला तात्काळ निलंबित करणे अपेक्षित होते. शाळेतील १४ वर्षाची ९वीत शिकणारी मुलगी गेल्यावर शाळेच्या प्रिन्सिपॉल आणि इतर शिक्षक तिच्या आई-वडिलांना भेटणे अपेक्षित होते पण तसे न होता, प्रिन्सिपॉल आणि इतर शिक्षक शिवाजी नगर पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद झाल्यावर पोलीस स्टेशन च्या बाहेर दोन दिवस तळ ठोकून तपासात interference करताना दिसत होते. त्या शिवाय शाळेच्या प्रिन्सिपॉल आणि इतर शिक्षकांनी श्रावणीच्या मृत्यूपश्चात तिच्यावर शिंतोडे उडवण्याचे थांबवले नाही तर आम्ही त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करू.
शिखर संस्था CBSE बरोबर तपासले असता असे लक्षात आले जी स्ट्रेस फ्री शिक्षण शाळेची पहिली प्राथमिकता असणे अपेक्षित आहे परंतु किडीस इन्फो पार्क शाळे तील स्ट्रेसफुल्ल शिक्षणाने श्रावणीचा बळी घेतला.
त्यामुळे किडीस इन्फो पार्क, लातूर या शाळेची CBSE (regin०११३०८२१) मान्यता रद्द झाली पाहिजे आणि शिक्षण विभागाने कारवाई करावी, जेणेकरून श्रावणीला न्याय मिळेल आणि इतर मुलांबाबत अश्या घटनेची पुनर्वत्ति होणार नाही. त्याशिवाय juvenile justice act प्रकरण दोन पाहिले तर असे लक्षात येते या घटनेमुळे त्या कलमांचे उल्लघन झाले आहे.त्यामुळे बालकल्याण विभागाने त्वरित कारवाई करावी. अशी आपल्या माध्यमातून त्यांना विनंति पत्रकार परिषद घेवून मागणी केली