Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

ध्वनीप्रदुषण करणार्‍या वाहनावर कारवाई करा

गुन्हेगारीचा पर्दाफाश….!
ध्वनीप्रदुषण करणार्‍या वाहनावर कारवाई करा
मनसे महिला आघाडीची मागणी


लातूर, दि.१९- शहरात ध्वनीप्रदूषण करणार्‍या दुचाकी वाहनांची संख्या वरचेवर वाढत चालली असून अशा वाहनधारकावर कारवाई करावी अशी मागणी मनसेच्या महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा प्रीती भगत यांनी एका निवेदनाद्वारे केली आहे.
वाहतूक नियंत्रक शाखेचे पोलिस निरीक्षक सुनिला बिर्ला यांची भगत यांच्या नेतृत्वाखाली एकाशिष्ट मंडळाने भेट घेतली. त्यावेळी त्यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, लातूर शहरातील प्रत्येक प्रभागात ध्वनीप्रदूषण वाढले असून दुचाकीस्वार मोठ्या आवाजात वाहने पळवितात. विशेषतः बुलेटस्वार गाडीचा आवाज मोठ्याने काढत असून याचा त्रास शाळा, महाविद्यालय तसेच शिकवणीचा परिसरात होत आहे. अशा दुचाकीस्वारांना कोणी विचारणा केली तर ते उलट दमदाटीची भाषा वापरतात. अशा वाहनांना कर्णकर्कश हॉर्न असून त्याचा आवाजाचा त्रास सामान्य नागरिक तसेच दवाखान्यात ऍडमीट असलेल्या रूग्णांना होत आहे. त्यामूळे ध्वनी प्रदूषण करून लातूरकरांची शांतता भंग करणार्‍या दुचाकीस्वारावर कारवाई करावी अशी मागणी शेवटी करण्यात आली आहे.
या निवेदनावर महिला जिल्हाध्यक्षा प्रिती भगत, डी. एम. ठाकूर, जहॉगिर शेख, नारायण पुरी, रेणूका कांबळे, पवन सरवदे, धनंजय मुंडे, गोविंद मोरे आदिंच्या स्वाक्षर्‍या आहेत.

Post a Comment

You have in a dout late me know

Previous Post Next Post