Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

मोटर वाहन निरिक्षकास RTO कार्यालयाच्या आवारात मारहाण

गुन्हेगारीचा पर्दाफाश….!
मोटर वाहन निरिक्षकास RTO कार्यालयाच्या आवारात मारहाण

लातूर-लातूर मधिल RTO कार्यालयाच्या आवारात मोटर वाहन निरिक्षकास मारहाण करण्यात आल्याचा धक्कादायक व्हिडिओ व्हायरल असुन,घरघुती कारणावरुन त्यास मारहाण करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.






पहा तो व्हिडिओ
-लातूर येथील प्रादेशिक परिवहन कार्यालयात कार्यरत असलेल्या एका मोटार वाहन निरीक्षकास कर्तव्यावर असताना मारहाण करण्यात आल्याची घटना मंगळवारी दुपारी १२.२० वाजेच्या सुमारास घडली. 

मंगळवारी दुपारी १२ वाजेच्या 5. सुमारास आरटीओ कार्यालयातील वाहन फिटनेस तपासणीच्या ट्रॅकवर आहे. कार्यरत असलेल्या एका मोटार वाहन निरीक्षकासोबत काही महिला व सोबतच्या व्यक्तींनी बाचाबाची सुरू केली. यावेळी काहीजण भांडण सोडविण्यासाठी गेले. वादावादी सुरू असताना काहीजणांनी मोटार वाहन निरीक्षकास धक्काबुक्की केली. ट्रॅकवरचा गोंधळ पाहून उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय भोये हे घटनास्थळी आले, त्यांनी संबंधित कुटुंबाची समजूत काढली.दरम्यान, विवेकानंद चौक पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांनी आरटीओ कार्यालयाला भेट देऊन घटनेची माहिती घेतली.

कौटुंबिक वादातून घडला प्रकार....

* मोटार वाहन निरीक्षकास मारहाण करणारे त्यांच्या कुटुंबातील सदस्य आहेत. कौटुंबिक वादातून हा प्रकार घडला असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, कर्तव्यावर असताना शासकीय कामात अडथळा निर्माण करून मारहाण केल्याप्रकरणी विवेकानंद चौक पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली.



 

Post a Comment

You have in a dout late me know

Previous Post Next Post