लातूर येथे सिने अभिनेते शरद पोंक्षे यांचे व्याख्यान
लातूर/प्रतिनिधी:स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त भारत विकास परिषद शाखा,लातूरच्या माध्यमातून सिने अभिनेते तथा प्रख्यात विचारवंत शरद पोंक्षे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.'साहित्यातून राष्ट्रजागरण-बंकिमचंद्र ते सावरकर' या विषयावर दयानंद सभागृहामध्ये सोमवारी (दि.
८ ऑगस्ट) सायंकाळी ६ वाजता हे व्याख्यान होणार आहे.यावेळी ऋषी बंकिमचंद्र यांच्यावर आधारित पुस्तक प्रकाशन सोहळाही आयोजित करण्यात आला आहे.आरोह प्रस्तुत 'अनादी मी अनंत मी' हा स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या गीतांचा कार्यक्रम सादर केला जाणार आहे.
भारत विकास परिषद या संघटनेच्या माध्यमातून लातूरमध्ये विविध सामाजिक कामे राबविली जातात.व्याख्याने आयोजित केली जातात.त्या माध्यमातून लहान मुले व तरुण यांच्यावर संस्कार केले जातात.याचाच एक भाग म्हणून पुणे येथील नामवंत लेखक मिलिंदजी सबनीस यांनी तीस वर्षे संशोधन करून लिहिलेल्या ऋषी बंकिमचंद्र (वंदे मातरमचे रचनाकार)या ग्रंथाचे प्रकाशन व साहित्यातून राष्ट्रजागरण या विषयावर व्याख्यान होणार आहे.
या व्याख्यानास लातूरकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन भारत विकास परिषद शाखेचे अध्यक्ष सुधाकर जोशी,सचिव अमित कुलकर्णी, कार्यक्रम प्रमुख डॉ.अभिजीत मुगळीकर,सहप्रमुख अमोल बनाळे यांनी केले आहे.