मनपा कार्यालयांची 'आझादी का अमृत महोत्सव' अंतर्गत स्वच्छता
लातूर /प्रतिनिधी: 'आझादी का अमृत महोत्सव' अंतर्गत महानगरपालिकेमार्फत विविध उपक्रम राबविले जात आहेत.याचाच एक भाग म्हणून महानगरपालिकेच्या कर्मचारी यांच्यावतीने मनपा मुख्य कार्यालय व सर्व क्षेत्रीय कार्यालये आणि परिसराची संपूर्ण स्वच्छता करण्यात आली.
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवा निमित्त विविध कार्यक्रम घेतले जात आहे.शासकीय कार्यालयांवर आकर्षक रोषणाई केली जात आहे.प्रत्येक घरावर तिरंगा ध्वज लावण्याचे नियोजन करण्यात आले आहे.या उपक्रमांच्या जोडीला महानगरपालिकेची कार्यालये स्वच्छ करण्याचा उपक्रम राबवण्यात आला.
मनपाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सर्व क्षेत्रीय कार्यालयांची स्वच्छता केली.कार्यालयांचा परिसरही स्वच्छ करण्यात आला.पालिकेचे मुख्य कार्यालय आणि ज्या-ज्या ठिकाणी पालिकेचे कामकाज चालते त्या सर्व ठिकाणांची कर्मचाऱ्यांनी स्वच्छता केली. नागरिकांनीही स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर आपले घर व परिसर स्वच्छ ठेवावा, असे आवाहन मनपा आयुक्त अमन मित्तल यांनी केले
आहे