Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

शिक्षक घोटाळा प्रकरणात एका फ्लॅट मधून 5 किलो सोने व करोडो रुपये जप्त

गुन्हेगारीचा पर्दाफाश….!

शिक्षक घोटाळा प्रकरणात एका फ्लॅट मधून 5 किलो सोने व करोडो रुपये जप्त 


पश्चिम बंगालमधील शिक्षक घोटाळा प्रकरणी आणखीनच धक्कादायक गोष्टी समोर येत आहेत. आता ईडीच्या हाताला शिक्षक घोटाळा प्रकरणी अटक करण्यात आलेल्या आणि मंत्री पार्थ चॅटर्जी यांच्या निकटवर्तीय म्हणुन मानल्या जाणाऱ्या अर्पिता मुखर्जी यांच्या घरामध्ये ईडीला आता एक डायरी सापडली मोठा धक्कदायक खुलासा होण्याची शक्यता आहे.
काही दिवसांपूर्वी ममता बॅनर्जी सरकारमधील वाणिज्य मंत्री पार्थ चॅटर्जी यांना शिक्षक घोटाळा प्रकरणी अटक करण्यात आली.तसेच त्यांच्या निकटवर्तिय असलेल्या अर्पिता मुखर्जी यांच्या घरावर ईडीने धाडटाकणे सुरु आहे. छापेमारी दरम्यान अर्पिता मुखर्जी यांच्या कोलकात्यातील घरातून पुन्हा एकदा कोट्याधीश रुपये ताब्यात घेण्यात आले आहेत.ईडीने कारवाई करत पुन्हा एकदा बुधवारी कोलकात्याच्या आसपास तीन ठिकाणी धाड  टाकली. या छाप्यांमध्ये ईडीला अर्पिता मुखर्जीच्या बेलघरिया येथील आणखी एका फ्लॅटमधून तब्बल २९ कोटी रुपये रोखड आणि ५ किलो सोनेआढळून आले आहे.मात्र विशेष म्हणजे, ही रक्कम मोजण्यासाठी ईडीच्या चमूला तब्बल १० तास लागले. चकित करणारी गोष्ट म्हणजे, अर्पिताने हा पैसा चक्क फ्लॅटच्या टॉयलेटमध्ये लपवून ठेवला होता.
तसेच गेल्या ५ दिवसांपूर्वी देखील ईडीला अर्पिताच्या एका फ्लॅटमधून सुमारे २१ कोटी रुपये रोख आणि काही मौल्यवान वस्तू देखील सापडल्या होत्या.त्यामध्ये अर्धा-अर्धा किलोच्या सोन्यांच्या बांगड्यांचा देखील समावेश आहे. त्यामुळे आतापर्यंत अर्पिताच्या घरातून ईडीला तब्बल ५० कोटी रुपये ताब्यात घेतले आहेत. ईडीने अर्पिताला २३ जुलै रोजीच अटक करण्यात आली होती.याशिवाय अर्पिताच्या घरातून ईडीच्या हाताला एक काळी डायरी देखील लागली आहे. सदर डायरी ही Department of Higher And School Education च्या निगडित असल्याचे सांगितले जात आहे. ही डायरी ४० पानांची असून यामध्ये अनेक महत्वाच्या गोष्टींचा उल्लेख आहे.ही डायरी शिक्षक भरती घोटाळाप्रकरणीचे अनेक रहस्यमय गोष्टींचा खुलासा होण्याची शक्यता आहे. एवढेच नाही तर ईडीच्या अधिकाऱ्यांना मंत्री पार्थ चटर्जी यांच्या घरातून क्लास सी आणि क्लास डी सेवाच्या भरतीतील उमेदवारांशी निगडित कागदपत्रे देखील मिळाली आहेत.समोर आलेल्या पुरव्यांनुसार ग्रूप डी कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीमध्ये पार्थ चटर्जी यांचा सक्रियपणे सहभाग असल्याचे देखील बोलले जात आहे.अर्पिता मुखर्जी यांनी शिक्षक घोटाळा प्रकरणी ईडीला दिलेल्या कबुली जबाबत असे म्हणाल्या आहेत की, ईडीने छापेमारी दरम्यान सापडलेले सगळे पैसे हे पार्थ चॅटर्जी यांचे आहेत.तसेच त्यांचेच लोक हे पैसे घेऊन येत होते. मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, अर्पिता मुखर्जी या काळ रात्री पासून रडत आहेत. ईडीच्या चौकशी नंतर ती पूर्ती हादरून गेली आहे. तसेच ती रात्री उशिरा झोपली असल्याचे देखील सांगितले जात आहे.याशिवाय तर आपण निर्दोष असून याबाबत आपल्याला काहीही माहिती नाही. आपल्याला त्या खोलीत जाण्याची परवानगी देखील नव्हती, असे सुद्धा अर्पिता म्हणाली आहे.मात्र दुसरीकडे , ईडीने कारवाई केल्यानंतर विरोधी पक्ष आक्रमक झाला असून, विरोधी पक्षाने पार्थ चॅटर्जी यांना मंत्रिमंडळातून काढण्याची मागणी देखील केली आहे.एवढेच नाही, तर शिक्षक भरती घोटाळ्यातील मनी ट्रेलची चौकशी करणाऱ्या ईडीने पश्चिम बंगाल माध्यमिक शिक्षण मंडळाचे माजी अध्यक्ष तथा टीएमसी आमदार माणिक भट्टाचार्य यांची देखील चौकशी केली आहे.

Post a Comment

You have in a dout late me know

Previous Post Next Post