Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

सनातन संस्थेच्या वतीने 11 ऑक्टोबरपासून ‘आनंदी जीवनासाठी अध्यात्माचे महत्त्व’ या विषयावर 9 भाषेत ‘ऑनलाईन’ साधना प्रवचन शृंखला !

सनातन संस्थेच्या वतीने 11 ऑक्टोबरपासून ‘आनंदी जीवनासाठी  अध्यात्माचे महत्त्व’ या विषयावर 9 भाषेत ‘ऑनलाईन’ साधना प्रवचन शृंखला !



गेल्या तीन दशकांपासून सनातन संस्था जिज्ञासू आणि साधक यांचे अध्यात्म आणि साधना यांच्या संदर्भातील शंकांचे निरसन करून त्यांना ईश्‍वरप्राप्तासाठी मार्गदर्शन करत आहे. सध्या कोरोना महामारीमुळे सर्वच लोकांना सत्संग आणि प्रवचन यांसाठी प्रत्यक्ष बाहेर जाणे शक्य होत नाही. अशा वेळी घरी राहून लोकांना साधनेविषयी मार्गदर्शन मिळावे, यासाठी सनातन संस्थेने ‘आनंदी जीवन आणि आपत्काळ यांच्या दृष्टीने अध्यात्माचे महत्त्व’ या विषयावर ‘ऑनलाईन साधना प्रवचन शृंखला’ आयोजित केली आहे. हे ऑनलाईन प्रवचन 11 ऑक्टोबर, 18 ऑक्टोबर आणि 24 ऑक्टोबर 2020 या दिवशी मराठी, हिंदी, इंग्रजी, गुजराती, कन्नड, तेलगु, मल्याळम्, तमिळ आणि बंगाली या 9 भाषेत होणार आहे. तरी सर्व जिज्ञासू बंधू-भगिनींनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन सनातन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.                                           


     धर्मशास्त्रात ईश्‍वरप्राप्तीचे अनेक मार्ग सांगितले आहेत; पण या हजारो साधनामार्गांपैकी नेमक्या कोणत्या साधनेला आज प्रारंभ करावा ? दैनंदिन धकाधकीचे जीवन आणि सध्याच्या कोरोनासारख्या आपत्तीच्या काळात अध्यात्माचे महत्त्व काय ? पितृदोष म्हणजे काय आणि त्याचे निवारण करण्यासाठी कोणती साधना करावी ? जीवन आनंदी बनवण्यासाठी कोणती साधना करावी ? अशा विषयांवर या प्रवचनामध्ये अमूल्य मार्गदर्शन केले जाणार आहे. साधनेमुळे आत्मबल वाढते आणि त्यामुळे प्रतिकूल वातावरणातही आनंदी जीवन जगता येते. यासाठी ही साधना प्रवचन शृंखला आहे. प्रस्तूत प्रवचन मालिका पुढील यू-ट्यूबच्या लिंकवरून प्रक्षेपित होणार आहेत. त्याचा जिज्ञासूंनी लाभ घ्यावा.


भाषा    -   वेळ  -   यू ट्यूब लिंक


1. मराठी    -  दुपारी 4 ते 5                          Youtube.com/Dharmashiksha
2. हिंदी   -   सायंकाळी 6 ते 7                    Youtube.com/HJSUttarBharat
3. कन्नड    -   सायंकाळी 6.30 ते 7.30   -      Youtube.com/SSKarnataka
4. गुजराती    -   दुपारी 4.30 तेे 5.30    -    Youtube.com/HJSUttarBharat
5. तमिळ   -    सायंकाळी 6 ते 7                     Youtube.com/HJSTamil
6. मल्याळम्   -  सकाळी 11.30 ते 12.30   -   Youtube.com/HJSKeralam
7. तेलुगु   -   सायंकाळी 6 ते 7                    Youtube.com/TeluguHJS1
8. बंगाली   -  सायंकाळी 5 ते 6                    Youtube.com/HJSNorthEastBharat
9. इंग्रजी  -   दुपारी 4 ते 5                           Youtube.com/ssenglish



आपला नम्र,
श्री. हिरालाल तिवारी, सनातन संस्था,
(स्थानिक संपर्क : ९९७५५ ९२८५९)


 


Post a Comment

You have in a dout late me know

Previous Post Next Post