Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ(रजि) महाराष्ट्र राज्य ही संघटना घेणार पत्रकारांच्या समस्या व प्रश्नांची दखल

 


प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ(रजि) महाराष्ट्र राज्य ही संघटना घेणार पत्रकारांच्या समस्या व प्रश्नांची दखल


महाराष्ट्रातील सर्व संपादक व पत्रकार बांधवांना आवाहन करण्यात येते की, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लाॅकडाऊनच्या काळात काही पत्रकारांवर लाठीमार करण्यात आला, काही पत्रकारांना नोटीस बजावण्यात आली आणि सर्वात महत्वाचे म्हणजे डाॅक्टर, पोलिस, नर्स यांच्यासारखेच आपला जीव धोक्यात घालून पत्रकार बांधव कोरोनाची बातमी संकलन करणेसाठी सातत्याने बाहेर फिरत आहेत पण शासनाने  पत्रकारांना अद्यापही कोणतीच मदत जाहीर केलेली नाही. ना विमा संरक्षण, ना पॅकेज! पत्रकारांनी जीव धोक्यात घालायचा आणि समाजापर्यंत बातमी पोहोचवायची, राजकीय मंडळीची प्रसिद्धी करायची, रात्रंदिवस देशवासीयांच्या सेवेसाठी सदैव तत्पर असणारा पत्रकारचं का वंचित राहीला ? पत्रकारांना कोणत्याही प्रकारचा शासकीय पगार मिळत नाही, मानधन मिळत नाही , सध्या जाहिराती बंद आहेत मग पत्रकारांनी जगायचं कसं? हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे. ग्रामीण भागात तर पत्रकारांच्या चुली बंद होण्याची वेळ आलेली आहे. लोकशाहीचा चौथा स्तंभ मात्र यावेळी दूर्लक्षित राहीला याला जबाबदार कोण? 
सध्या पत्रकारांची आठवण कोणत्याही राजकीय नेत्यांना येत नाही, सध्या पत्रकार बातमी देतात बातमी प्रसिद्ध होते बातमी  सर्वांपर्यत पोहचतेय आणि पत्रकार मात्र उद्याच्या आशेवर आज उपाशी जगतोय. 
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील सर्व संपादक व पत्रकार बांधवांना *प्रेस संपादक व* *पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र* *राज्य* या संघटनेचे आवाहन आहे की, लाॅकडाऊनच्या काळात ज्या संपादक किंवा पत्रकारांना ज्या ज्या समस्यांना सामोरे जावे लागले ती समस्या 10 ते 15 ओळीत लिहून पाठवा किंवा 30 ते 60 सेकंदाचा विडीओ करून *प्रेस संपादक व पत्रकार* *सेवा संघ* *महाराष्ट्र* *राज्य* या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आंबेगावे डी. टी. यांच्या 9270559092 या व्हाट्सअॅपवर दि. 14 / एप्रिल/ 2020 पर्यंत पाठवावे पत्रकारांच्या प्रत्येक समस्येची संघटना दखल घेणार असल्ययाचे संघाचे संस्थापक अध्यक्ष अंबेगावे डि.टी. यांनी सांगीतले आहेसंघाचे संस्थापक अध्यक्ष अंबेगावे डि.टी. यांनी सांगीतले आहे


 


Post a Comment

You have in a dout late me know

Previous Post Next Post