Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

कोरोना व्हायरसची खबरदारी म्हणून आठवडी बाजार बंद .....

 


कोरोना व्हायरसची खबरदारी म्हणून आठवडी बाजार बंद .....


औसा /प्रतिनिधी


जगभरातील कोरोना व्हायरसमुळे जनता भयभीत झाली आहे. कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी खबरदारीची उपाययोजना म्हणून नागरिकांनी सतर्क राहावे, अनावश्यक गर्दी टाळावी, तसेच दि. 31 मार्च 2020 आठवडी बाजार बंद ठेवावेत असे आव्हान औसा नगर परिषदेचे मुख्याधिकारी तानाजी चव्हाण यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकान्वये केले आहे. कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायदा 1897 हा दि. 13/ 3 /2020 पासून उपरोक्त कायदा लागू करून खंड 2, 3, व 4 मधील तरतुदीनुसार अधिसूचना निर्गमित केल्याने अनावश्यक गर्दी टाळण्यासाठी आठवडी बाजार बंद राहील असे आव्हान नगर परिषद मुख्याधिकारी औसा यांनी केले आहे


Post a Comment

You have in a dout late me know

Previous Post Next Post